घरमुंबईवॉटर टॅक्सीला येत्या आठवड्याचा मुहूर्त

वॉटर टॅक्सीला येत्या आठवड्याचा मुहूर्त

Subscribe
मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे मुंबई अलिबाग मार्गावर फेरी सेवा सुरू करण्यात आल्यानंतर आता लवकरच या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू करण्यात येणार असून, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या वॉटर टॅक्सी सेवेबरोबर कानोजी आंग्रे टुरिझम डेव्हलपमेंट प्रकल्पाचे भूमिपूजनही यानिमित्ताने केले जाणार असल्याची घोषणा गुरुवारी मुंबई पोर्ट टस्ट्रतर्फे करण्यात आली आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने आगामी काळात सागरी टुरिझम आणि सागरी वाहतुकीच्या दृष्टीकोनातून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ज्यात प्रामुख्याने राष्ट्रीय क्रूझ टर्मिनस, रो पॅक्स टर्मिनस, तरंगते तलाव आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ यासारख्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पाबरोबर पोर्ट अलिबागतर्फे ट्रस्टतर्फे कानोजी आंग्रे  जेटी सेवेचे कामही हाती घेण्यात आले होते. सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, मुंबई ते अलिबाग या मार्गावर जेटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेबरोबर मुंबई ते अलिबाग या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवादेखील सुरू करण्यात येणार आहे.
या सुविधेबद्दल बोलताना मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया म्हणाले की, येत्या २४ जानेवारीला या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. ज्यात कानोजी आंग्रे जेटी सुविधेचे उदघाटन होणार असून, कानोजी आंग्रे टुरिझम डेव्हलपेंट प्रकल्पाचे भूमिपूजनदेखील करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पर्यटन व्यवस्थेला आणखीन चालना मिळेल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -