घरमुंबईधक्कादायक! मुलाची हत्या करुन आईने केली आत्महत्या

धक्कादायक! मुलाची हत्या करुन आईने केली आत्महत्या

Subscribe

नवऱ्याशी भांडण झालं या शुल्लक कारणावरुन सदर महिलेने इतकं भयानक कृत्य केल्याचं समोर आलं आहे

मुंबईच्या कुर्ला परिसरात एका महिलेने आधी मुलाची हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुजा वंजारी असं त्या महिलेचं नाव असून नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे तिने हे भयानक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. नवऱ्यावर संतापलेल्या अनुजाने आपल्या ३ वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:लादेखील संपवून घेतले. एका लग्नसमारंभात अनुजाचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते त्यामुळे रागाच्या भरात तिने हे पाऊल उचलल्याचं समजतं. सूत्रांनुसार, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून संपूर्ण घटनेचा उलगडा झाल्यानंतरच आणि त्याची शाहानिशा केल्यानंतरच नेमकी तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सविस्तर घटना…

कुर्ला येथील व्हीबी नगरमधील गुरुदत्त सोसायटीत अनुजा तिच्या कुटुंबासोबत राहायची. मंगळवारी रोजच्या दिनक्रमानुसार अनुजाचा सासू आणि नवरा कामासाठी घराबाहेर पडले. मनात नवऱ्याविरुद्धचा राग असल्याने अनुजा एकाएकी उठली आणि ओढणीने आपल्या मुलाचा गळा घोटून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी कामावरुन परतलेल्या अनुजाच्या सासूने अनुजा बराचवेळ दार उघडत नसल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर शेजारील एक तरुण घराच्या खिडकीमधून आत घुसला. त्यावेळी घरात नेमकं काय झालंय यााचा उलगडा झाला. कुर्ला पोलिसांनी याप्रकरणी  गुन्हा दाखल केलेला नसून, अनुजाच्या पालकांची चौकशी केल्यानंतर तसंच प्रकरणाची पुन्हा तपासणी केल्यानंतरच गुन्हा दाखल करु, असं पोलिसांनी सांगितलं आहे. अनुजाचे कुटुंबिय करमाळा गावात वास्तव्याला आहेत.


वाचा : १४ फेब्रुवारीला मुलीचं लग्न, आईला हवंय संरक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -