घरमुंबईयुतीला होणाऱ्या विलंबामुळे शिवसेना-भाजपा खासदार अस्वस्थ

युतीला होणाऱ्या विलंबामुळे शिवसेना-भाजपा खासदार अस्वस्थ

Subscribe

अजूनही युतीचा तिढा सुटला नसल्याने उरलेल्या दिवसात प्रचार करायचा तरी कसा अशी चिंता शिवसेनेच्या ग्रामीण भागातील खासदारांना पडली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होतील. मात्र अजूनही शिवसेना-भाजपा युतीचे घोंगड भिजत पडले आहे. त्यामुळे शिवसेनेसह भाजपाचेही ग्रामीण भागातील खासदार सध्या चिंतेत आहेत. त्याचे कारण म्हणजे अजूनही युतीचा तिढा सुटला नसल्याने उरलेल्या दिवसात प्रचार करायचा तरी कसा अशी चिंता शिवसेनेच्या ग्रामीण भागातील खासदारांना पडली आहे. ग्रामिण भागातील शिवसेनेच्या काही खासदार आणि आमदरांशी आपलं महानगरने संपर्क केला असता त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे.

युती होणार पण कधी?

युती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण ही युती लवकरात लवकर झाली तर मतदार संघात प्रचार करायला वेळ मिळेल आणि त्या दृष्टीने काही तरी रणनीती आखता येतील असे या खासदारांनी आपलं महानगरशी बोलताना बोलून दाखवले. दरम्यान ग्रामीण भागातील काही खासदरानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली तेव्हा युती शिवाय ग्रामिण भागात निवडणूक लढवणे शक्य नसल्याची खंत बोलून दाखवल्याचेही या खासदारांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

काही ठराविक लोकांमुळे युतीला उशीर 

मुंबईत असलेले शिवसेनेने काही ठराविक नेते आहेत ज्यांना ग्रामिण भागातील परिस्थितीचे भान नाही. त्यामुळे ते मुंबईत बसून, युतीमध्ये बिघाड आणत असल्याचा अप्रत्यक्ष टोला या खासदारांनी आपलं महानगरशी बोलताना मांडला. मुंबईत बसून आरोप प्रत्यारोप करणे सोपं असतं पण ग्रामिण भागातल्या खासदार-आमदारांना त्यांच्या मतदार संघात जावं लागतं त्यामुळं लवकरात लवकर युतीचा तिढा सुटावा जेणेकरून पुढची रणनीती ठरवता येईल असे या खासदारांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

भाजपाच्या खासदारांची देखील हीच अव्यथा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जशी अस्वस्थता शिवसेनेच्या ग्रामीण भागातील खासदार-आमदार यांच्यामध्ये आहे तशीच काहीशी स्थिती भाजपाच्या देखील खासदारांमध्ये आहे. २०१४ ची स्थिती वेगळी होती आताची वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मोकळे व्हावे असे काही भाजपाच्या ग्रामीण भागातील आमदार तसेच खासदारांनी दबक्या आवाजात आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -