घरमुंबईठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही - संजय राऊत

ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही – संजय राऊत

Subscribe

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त रेनेसां हॉटेलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेवर टीका केली. त्यांनी देशाचं रक्षण कुणी करायचे हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हाती सत्ता आहे. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही.असा टोला केंद्र सरकारला लगावला.

त्या ठिणगीचा वणवा झाला आहे – 

- Advertisement -

56 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठिणगी टाकली. त्या ठिणगीचा आज देशभर वणवा झाला आहे. आज फादर्स डे आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे बाप असल्याचेही राऊत म्हणाले. जगात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे त्यांच्या मनातला बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडे सुत्र असल्याचे महाराष्ट्र शांत –

- Advertisement -

शिवसेनेचा बाणा स्वाभिमानाचा, राष्ट्रीय, मराठी अन्यायाविरुद्ध लढण्याचा आहे. हा बाणा सर्वांच्या छाताडावर उभा राहिल. अंगावर आला तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवून लावू, अशी टीका संजय राऊत यांनी केली. पुढे त्यांनी राज्याची सुत्र उद्धव ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शांत आहे. हे राज्य सर्वांना एकत्र करून चालवाने लागेल. कपट कारस्थान करुन राजकारण होणार नाही, असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.

हमारी बादशाही खानदानी है –

दरम्यान राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले नाही. राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील, फार घमंड करु नका. ‘तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी है, असे म्हणत राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. बादशाहीला नख लावण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असे ते म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -