घरताज्या घडामोडीसहल तिथे एसटी, शाळांनी दिला एसटीला आधार

सहल तिथे एसटी, शाळांनी दिला एसटीला आधार

Subscribe

शाळा-महाविद्यालयाची सहल म्हटली की पूर्वी पटकन एसटी डोळ्यासमोर यायची. एसटी महामंडळाकडून शालेय सहलीसाठी ५० टक्के सवलतही देण्यात येते. मात्र पण याच शालेय सहलींना गेल्या वर्षीग्रहण लागले होते. शिक्षण विभागाने शालेय सहली संदर्भात एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकातील अटी -शर्ती म्हणजे शालेय सहली मुख्याध्यापकांनी काढूच नयेत यासाठी केलेला नकारात्मक खटाटोपच होता.मात्र एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी यावर सुध्दा मात करत,थेट शाळेशी संपर्क करुन पुढाकरा घेतल्याने यंदा शालेय सहलीपासून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात ३६ कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे तोट्यात गेल्या एसटी काही प्रमाणात शालेय सहलीला तारले आहे.

शाळांच्या सहलीसंदर्भात राज्याच्या शिक्षण संचालनालयाने तब्बल 22 अटी घातल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची सहल शाळा प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.या अटींच्या अधीन राहूनच शालेय सहल काढण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहे.तसेच सहलीदरम्यान एखादी अघटित घटना घडली तर त्याला जबाबदार शाळा प्रशासनाला धरणार असल्याने शाळांकडून सहली काढल्या जात नाहीत. त्याचा फटका राज्यातील पर्यटनस्थळांना बसत होताच मात्र ग्रामीन भागाची लालपरी अर्थांत एसटीला मोठ आर्थिक नूकसान झाले होते. दरवर्षी शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीला मिळणारे हमखास उत्पन्न एकदमच कमी झाले. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीला  ६३ कोटी (प्रतिपूर्तीसह ) उत्पन्न मिळाले होते. ते या तथाकथित परिपत्रकामुळे २०१८-१९ मध्ये  २४  कोटी (प्रतिपूर्तीसह )पर्यंत घसरले. यंदाच्या वर्षी मात्र एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन, थेट मुख्याध्यापकांना आवाहन केले. शालेय सहली एसटीच्या बसेसमधून काढाव्यात, यासाठी प्रत्येक आगाराचे प्रमुख शाळेत जाऊन शिक्षक, विद्यार्थ्यांना भेटले, त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे सन २०१९-२० या शालेयवर्षात एसटीला शालेयसहलीच्या माध्यमातून रु. ६०  कोटी (प्रतिपूर्तीसह ) रुपये उत्पन्न मिळाले.सन २०१८-१९ तुलनेत या वर्षीच्या उत्पन्नात ३६ कोटींनी वाढ झाली आहे.

- Advertisement -

विद्यार्थांनी केले कौतूक

शालेय सहलीसाठी शासन विद्यार्थ्यांना एसटीच्या प्रासंगिक करारावर ५० टक्के सवलत देते. त्यामुळे इतर खासगी बसेसच्या तुलनेत शाळांना एसटीने सहल काढणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वच शाळा प्रामुख्याने सहलीसाठी एसटीलाच प्राधान्य देतात. यंदा एसटी प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक पुढाकारामुळे अनेक शाळांनी सहली काढण्याचा प्रयत्न केला. अर्थातविद्यार्थ्यांसाठी शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीने त्यांचा बालपणीच्या आठवणींचा”हळवा कोपरा” मात्र जाणीवपूर्वक जपण्याचा प्रयत्न केला आहे. याचे कौतुक सर्वत्र होत आहे.

शिक्षण विभागानेशालेय सहली संदर्भात एक परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकातील तब्बल 22  अटी -शर्ती  घातल्या होत्या. या अटींच्या अधीन राहूनच शालेय सहल काढण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहे. म्हणजे शालेय सहली मुख्याध्यापकांनी काढूच नयेत यासाठी केलेला नकारात्मक खटाटोपच होता. दोन वर्षांपूर्वी अलिबागच्या समुद्रकिनार्‍यावरकाही शालेय मुले पोहताना बुडून मृत्युमुखी पडली होती. या घटनेच्या अनुषंगाने संबंधित शिक्षण संचालकांनी शालेय सहली संदर्भात जाचक अटी -शर्तीचे परिपत्रक सर्व शाळांना पाठवले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेत सहली काढण्याचे बंद केले.

शालेय सहली (वर्षनिहाय)

वर्ष                      बसेसची संख्या                   उत्पन्न (प्रतिपूर्तीसह)
सन २०१७-१८          १४५४७                            रु. ६३/- कोटी
सन २०१८-१९          ५२४८                              रु. २४/- कोटी
सन २०१९-२०         १०७८९                            रु. ६०/- कोटी
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -