घरमुंबई१० वर्ष अंबानींनी पगारवाढ घेतलीच नाही!

१० वर्ष अंबानींनी पगारवाढ घेतलीच नाही!

Subscribe

देशातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज. या इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी यांनी सलग १० वर्ष आपला पगार तितकाच ठेवला आहे. त्यांनी पगारवाढ, स्वीकारलेली नाही. भारतातील अग्रगण्य असलेले मुकेश अंबानी यांनी असं करून त्यांच्या कंपनीतील पदाधिकारीच नव्हे, तर देशातील अनेक उद्योगपतींसमोर एक वेगळंच उदाहरण ठेवलं आहे.
२००९ पासून वर्षाला १५ कोटी पगार
मुकेश अंबानी यांची वार्षिक कमाई ही १५ कोटी आहे. कंपनीच्या गुरूवारी झालेल्या वार्षिक सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी त्यांना ‘पगारवाढ नको’ अशी इच्छा व्यक्त केली. त्यांचं २०१७-१८ वर्षाचे भत्ते हे ४.९ कोटी रुपये होते, जे २०१६-१७ च्या वित्तीय वर्षातील ४.१६ कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित जास्त आहे. तर त्यांना मिळणारं कामगिरी आधारीत कमिशन ९ .५३ कोटी रूपये तितकंच राहिलं आहे. ऑक्टबर २००९ पासून अंबानी हे १५ कोटी मानधम स्वीकारत आहेत. परंतु इतर कार्यकारी संचालकांनी मात्र मानधनातील वाढ स्वीकारली आहे.

अंबानींच्या चुलत भावडांनाही इतका पगार
अंबानी यांचे चुलत भाऊ निखिल मेसवानी आणि हितल मेसवानी यांना प्रत्येकी १९.९९ कोटी रुपये वर्षाला पगार आहे, जो नियमितपणे वाढत आहे. २०१६-१७ मध्ये त्यांना वर्षाला प्रत्येकी १६.५८ कोटी रुपये पगार होता. २०१५-१६ मध्ये निखिलला १४.४२ कोटी रुपये तर हितलला १४.४१ कोटी रुपये पगार होता. याशिवाय मुकेश अंबानींच्या पत्नी आणि रिलायन्स कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असलेल्या नीता अंबानी ६ लाखांचं मानधन घेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -