घरमुंबईपालिका अधिकारी रजेवर, कारभार वाऱ्यावर!

पालिका अधिकारी रजेवर, कारभार वाऱ्यावर!

Subscribe

सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. शासकीय उच्चपदावरील अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकांच्या कामात गुंतले आहेत. नवी मुंबई महापालिकेत सध्या असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. हे सध्या निवडणूक कामांसाठी बाहेर आहेत. तर दिवाळीनंतर आयुक्त पालिकेत आलेच नसल्याचे दिसत आहेत. त्यात भर म्हणून की काय पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील आणि मुख्य शहर अभियंता सुरेंद्र पाटील हे रजेवर असल्याने पालिकेत निर्णय घेणारी व्यक्तीच नाही. त्यामुळे सध्या नवी मुंबईचा कारभार वाऱ्यावर आहे.

वाचा-पालिका थकबाकीदारांविरोधात कडक मोहीम राबविणार

निवडणुकीच्या कामात गुंतले अधिकारी

सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. शासकीय उच्चपदावरील अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकांच्या कामात गुंतले आहेत. नवी मुंबई महापालिकेत सध्या असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेनंतर आयुक्त रामास्वामी हे पालिकेत अनुपस्थित आहेत. तर पालिकेचे आयुक्त तेलंगणा निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळेच सध्या अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांच्याकडे पालिकेचा भार सोपवला आहे.

- Advertisement -
वाचा-कल्याण-डोंबिवली महापालिका आर्थिक दिवाळखोरीत

वीरेंद्र पाटीलही गेले रजेवर

अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. पण नवी मुंबई महापालिकेची, राजकीय नेत्यांची, कारभाराची आणि भोगौलिक परिस्थितीची संपूर्ण जाण नाही. शिवाय महासभेत आणि स्थायी समितीत पाटील यांची नगरसेवकांच्या प्रश्नांनी उत्तरे देताना व पालिकेची खिंड लढवताना तारांबळ उडालेली दिसली. सध्या साडेतीन हजार कोटींचे बजेट असलेल्या पालिकेचा कारभार सोपवल्यानंतर रवींद्र पाटील स्वत:च रजेवर गेले.

समाजविकास उपायुक्तांकडे कारभार

अतिरिक्त आयुक्त रजेवर गेल्यामुळे समाजविकास विभागाचे नवखे उपायुक्त अमोल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यानाही पालिका सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- Advertisement -

अभियंता विभागही वाऱ्यावर

अभियंता विभाग म्हणजे पालिका कारभाराचे शीर मानले जाते. हा विभाग शहरात विविध समोपयोगी सेवा व मूलभूत सुविधा पुरवत असतो. माजी मुख्य अभियंता मोहन डगावकर यांच्या निवृत्तीनंतर पदोन्नती मिळून मुख्य अभियंतापदी रुजू झालेले सुरेंद्र पाटील हे देखील रजेवर आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या जागी संजय देसाई हे कारभार पाहत आहेत. एकूणच सध्या पालिकेत मुख्याधिकारी नसल्याने कामे रेंगाळली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -