घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये पोटच्या तीन मुलांचा खून करून आईची आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पोटच्या तीन मुलांचा खून करून आईची आत्महत्या

Subscribe

पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये आईनंच पोटच्या तीन मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आईने पोटच्या तीन मुलांचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अद्याप आईने पोटच्या मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या का केली? हे स्पष्ट झालेले नाही. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. त्यांचे मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. फातिमा अक्रम बागवान वय-२८ असे आपल्या पोटच्या मुलांचा खून करणाऱ्या आईचे तर अलफिया अक्रम बागवान वय-९, झोया अक्रम बागवान वय-७ आणि जिआन अक्रम बागवान वय-६ अशी मुलांची नावं आहेत.


हेही वाचा – पाली जंगलात प्रेमी युगुलाची आत्महत्या

व्यवसायातल्या नुकसानामुळे नैराश्य?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत फातिमा अक्रम बागवान या चार दिवसांपूर्वीच भोसरी येथे कुटुंबासह राहण्यास आल्या होत्या. पती अक्रम हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय अगोदर तळेगाव येथे होता. परंतु तिथे मोठे नुकसान झाल्याने ते पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. आज सकाळी अक्रम हे बाहेर गेले असता पत्नी फातिमा यांनी आपल्या पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन त्यांचा खून केला. त्यानंतर स्वतः ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यातच पतीला व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. हे सर्व होत असताना कुटुंबाची फरफट होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. तिन्ही मुलं हे सावित्रीबाई फुले या शाळेत शिकत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -