घरमुंबईMumbai : धुळवडीला गालबोट, मुंबईतील माहिम समुद्रात 5 मुलं बुडाली; शोध सुरू

Mumbai : धुळवडीला गालबोट, मुंबईतील माहिम समुद्रात 5 मुलं बुडाली; शोध सुरू

Subscribe

मुंबई : धुळवडी सणाला मुंबईत गालबोट लागले आहे. माहिम येथील समुद्रकिनारी फियारला आलेली 5 मुलं बुडाली असून यातकील 4 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर एकाच शोध अग्निशमन दलाकडून अद्यापही सुरू आहे. यश कागडा असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Mumbai 5 children drowned in Mahim sea in Dhulwadi Mumbai Start the search)

हेही वाचा – Rupali Thombare : घरची आणि बाहेरची उंदरं…; अजितदादा गटाचे शर्मिला पवारांना जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण करीत रंगपंचमी उत्सव साजरा केला. मात्र दुपारी चारनंतर काही मुले माहिम-शिवाजी पार्क चौपाटी येथे समुद्रात पोहायला उतरली होती. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक एक करून पाच मुले समुद्रात बुडाली. यावेळी मुलांचा आरडाओरडा ऐकून काहीजण त्यांच्या मदतीला धावून आले. यावेळी पाच पैकी चार मुलांना वाचविण्यात यश आले. त्यापैकी दोघांची प्रकृती स्थिर असून उर्वरित हर्ष (19) आणि ओम (17) तत्काळ उपचारासाठी नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी ओमची प्रकृती स्थिर असून हर्षची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर पाचव्या मुलाचा समुद्रात शोध सुरू असल्याचे मुंबई महापालिका आपत्कालीन यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक, सागरी पोलीस आणि स्वयंसेवक बेपत्ता मुलाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – Mumbai : शिवसेना-भाजपच्या वादात ‘उर्दू सेंटर’ रखडले; रईस शेख यांचा आरोप

- Advertisement -

निरिक्षण मनोऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जुहू चौपाटीवर निरिक्षण मनोरे वाढविण्याची सूचना केली होती. मात्र आज माहिम-शिवाजी पार्क समुद्रात मुले बुडण्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवर निरिक्षण मोनोऱ्यांची संख्या व इतर आवश्यक गोष्टींचा आढावा घेवून समुद्रात बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी व तशा दुर्घटना टाळण्यासाठी निरिक्षण मनोऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -