घरमहाराष्ट्रRupali Thombare : घरची आणि बाहेरची उंदरं...; अजितदादा गटाचे शर्मिला पवारांना जोरदार...

Rupali Thombare : घरची आणि बाहेरची उंदरं…; अजितदादा गटाचे शर्मिला पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदासंघ राजकीय वर्तुळाच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण बारामती मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे. मात्र अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीवास पवार आणि शर्मिला पवार या सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. शर्मिला पवार यांनी आज (25 मार्च) बारामतीतील एका गावात सुप्रिया सुळे यांचा प्रचार केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली होती. शर्मिला पवार यांच्या या टीकेला अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Rupali Thombare Indoor and outdoor rats are gnawing Ajitdada groups strong response to Sharmila Pawar)

हेही वाचा – Baramati Constituency : जी लेक माहेरवाशीण…; सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या वहिनी मैदानात

- Advertisement -

शर्मिला पवार यांच्यावर हल्ला चढवताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदरं गरळ ओकायला लागली आहेत. आधी अजित पवार यांच्या बंधूंनी गरळ ओकली. आता शर्मिला पवार गरळ ओकत आहेत. खरं तर आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे, त्यांना द्वेष वाटत आहे. शर्मिला पवार यांना विनंती आहे की, त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळावं, अन्यथा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, असा थेट इशाराच रुपाली ठोंबरे यांनी दिला.

शिवतारेंना पवारांच्या घरातून पाठबळ

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी लढण्यावार ठाम आहेत. इतकचं नाही तर त्यांनी शिवसेनेतूनही बाहेर पडण्याचीही तयारी दाखवली आहे. या प्रश्नावर बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, अजित पवार यांनी स्वतःच्या कामाने स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण त्यांच्या पोटातील विष आता बाहेर पडत आहे. बाहेरचा उंदीर विजय शिवतारे गरळ ओकत आहे. त्यांना नक्कीच पवारांच्या घरातून कुणाचं तरी पाठबळ आहे. अन्यथा शिवतारेंची एवढी हिंमत होणार नाही. शिवतारेंना सुद्धा जशास तसे उत्तर देऊ, असेही रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Nashik Constituency : नाशिकच्या जागेसाठी भाजपा आग्रही; फडणवीसांच्या भेटीनंतर देवयानी फरांदेंचे वक्तव्य

शर्मिला पवार काय म्हणाल्या?

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या वहिणी शर्मिला पवार यांनी आज सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी आज संपूर्ण इंदापूर पालथा घातला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, सुप्रिया माझी भावजय असून त्या या मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना माझी साथ राहणार आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. त्यांनी म्हटले की, एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो, परंतु मलिदा गँगचा भाग व्हायचं नसतं. आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडली पाहिजे, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडील सोडू नये, असा टोलाही लगावला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -