घरताज्या घडामोडीमालाडमधील 'या' धोकादायक ब्रिटिशकालीन इमारतीवर पालिकेची कारवाई

मालाडमधील ‘या’ धोकादायक ब्रिटिशकालीन इमारतीवर पालिकेची कारवाई

Subscribe

मुंबईतील मालाडच्या पश्चिम परिसरात असलेल्या १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन धोकादायक इमारतीवर न्यायालयीन आदेशाने महापालिकेच्या पी/उत्तर विभागामार्फत कारवाई करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली असून इमारत कोसळल्यास होऊ शकणारी संभाव्य जिवीत हानी टाळण्यात आली आहे.

मुंबईतील मालाडच्या पश्चिम परिसरात असलेल्या १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन धोकादायक इमारतीवर न्यायालयीन आदेशाने महापालिकेच्या पी/उत्तर विभागामार्फत कारवाई करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली असून इमारत कोसळल्यास होऊ शकणारी संभाव्य जिवीत हानी टाळण्यात आली आहे. याबाबत पी/ उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी माहिती दिली. (Mumbai A 100 year old British era dangerous building in western Malad Demolished by bmc)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील एस. व्ही. रोड येथे ब्रिटीशकालीन १०० वर्षें जुनी इमारत कालपर्यंत अस्तित्वात होती. १९२३ मध्ये जुगल किशोर या नावाने ही इमारत उभारण्यात आली होती. या इमारतीत ३१ भाडेकरु राहत होते. त्यामध्ये १७ रहिवाशी सदनिका होत्या तर १४ व्यावसायिक गाळे होते. ही इमारत १०० वर्षे जुनी झाली होती व धोकादायक स्थितीत होती. ही इमारत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडून जिवीत हानी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने इमारत धोकादायक असल्याने ही इमारत खाली करण्याबाबत २०१२ ला नोटिशीद्वारे अगोदरच कळवले होते. मात्र इमारतीमधील भाडेकरू तयार नव्हते. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि त्यावर न्यायालयाने ही इमारत खाली करून पाडण्याचे आदेश पालिकेला दिले. त्यानुसार पालिकेने या १०० वर्षें जुन्या इमारतीवर कारवाई करून इमारत जमीनदोस्त केली.

- Advertisement -

या सर्व भाडेकरूंच्या पुनर्वसनाची जबाबदारी इमारतीच्या मालकाने घेतली आहे. त्यासाठी पालिकेच्या पी/ उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण मलिक यांनी कारवाईचा अँक्शन प्लॅन तयार केला होता. अखेर गुरुवारी ही धोकादायक १०० वर्षें जुनी इमारत पी/उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता मंदार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जमीनदोस्त करण्यात आली.

या पाडकामासाठी पी/उत्तर विभागाचे १७ अधिकारी, ५० कामगार, १७ अधिकारी, एक जेसीबी व १० डंपर व २५ पोलिसांचे साहाय्य घेण्यात आले. पुढील २४ तासांत पडलेल्या इमारतीचे डेब्रिज हटवण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; तरुण थेट पोहोचला ताफ्याजवळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -