घरताज्या घडामोडीMumbai Air Quality : मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट; नागरिकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

Mumbai Air Quality : मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट; नागरिकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

Subscribe

नवी दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब श्रेणीत पोहोचला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुंबईतील हवेची गुणवत्ता AQI 328 'खूप खराब' नोंदवण्यात आली आहे. त्याशिवाय, धुक्यामुळे शहरातील दृश्यमानतेवर परिणाम झाला असून प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा बिघडली असून अत्यंत वाईट श्रेणीत होती. त्यानंतर आता मुंबईतील हवेची नोंद नवी दिल्लीच्या तुलनेत अत्यंत खराब श्रेणीत करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुंबईतील हवेची गुणवत्ता AQI 328 ‘खूप खराब’ नोंदवण्यात आली आहे. मुंबईची हवा बिघडल्याने मुंबईत दिवसभर धुक्यासारखे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळते. (mumbai aqi is worse than delhi citizens suffer eye problems)

धुक्यामुळे शहरातील दृश्यमानतेवर परिणाम झाला असून प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील हवेच्या दर्जा खालावल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे.

- Advertisement -

हवेची गुणवत्ता तर खालावत चालली आहेच, पण वायू प्रदूषणामुळे नागरिकांना डोळ्यांचा त्रासही होऊ लागला आहे. हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे साथीचे आजार आणि श्वासोच्छवासाच्या संसर्गाबरोबरच नागरिकांना त्यांच्या डोळ्यात जळजळ, डोळे पाणावणे, कोरडेपणा, ऍलर्जी, सूज, लालसरपणा इत्यादींचा सामना करावा लागतो आहे.

मुंबईतील विविध क्षेत्रांमधील हवेची गुणवत्ता

- Advertisement -
  • कुलाबा: 159 AQI खराब
  • माझगाव : ४९३ AQI धोकादायक
  • वरळी: 171 AQI खराब
  • सायन: 192 AQI खराब
  • वांद्रे: 183 AQI खराब
  • विलेपार्ले पश्चिम: 259 AQI खराब
  • नेरुळ: 352 AQI गंभीर

याआधी अत्यंत खराब गुणवत्तेसह मुंबईच्या AQI ने राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाला मागे टाकले होते. मंगळवारी मुंबईचा AQI 306 वर खूप खराब होता. दरम्यान, PM 2.5 आणि PM 10 प्रदूषकांची एकाग्रता अनुक्रमे 128 आणि 176 होती.

दरम्यान, मुंबईनं रविवारी हंगामातील सर्वात थंड दिवस अनुभवला. तर तापमान 13.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने देशाच्या आर्थिक राजधानीत पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मंगळवारी शहराचे तापमान 15.71 अंश सेल्सिअस होते, तर आर्द्रतेचे प्रमाण 98 टक्के नोंदवले गेले.


हेही वाचा – राज्यातील कसबा पेठ अन् चिंचवड पोटनिवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतमोजणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -