घरमुंबईमुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय कर्मचाऱ्यांचे; २७ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय कर्मचाऱ्यांचे; २७ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण

Subscribe

वर्षाअखेरीस मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. यावेळी हे कर्मचारी बेमुदत उपोषण करणार आहेत.

वर्षाअखेरीस मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. यावेळी हे कर्मचारी बेमुदत उपोषण करणार आहेत. वेतनवाढ, बढतीसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कर्मचारी २७ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करणार आहेत. कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात तीन वेळा आंदोलन करूनही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. ग्रंथ संग्रहालयाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोनल छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

निविदा न मागवता होणारी ग्रंथालयीन कामे, मर्जीतील कर्मचाऱ्यांना बढती, शासनाची परवानगी न घेता संदर्भ विभागाची शुल्कवाढ करणे अनेक मुद्दे अनुत्तरीत आहेत. त्यावर सकारात्मक तोडगा आणि कार्यकारिणीकडून आश्वासनांची पूर्ती होण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत.
– सुचेता मोरे, चिटणीस, ग्रंथालय कर्मचारी संघ

- Advertisement -

विविध मागण्यांसाठी आंदोलन

कर्मचारी ग्रंथालय प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार असून या संदर्भातील लेखी निवेदन शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक, ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळाले पाहिजे ही संघटनेची प्रमुख मागणी आहे . त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना संस्थेत कायम करणे, त्यांचे वेतन मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात यावे, ग्रंथ संग्रहालयाच्या दादर विभागाची कार्यकारी समिती बरखास्त करावी, ग्रंथालयातील मोकळ्या जागेच्य नूतनीकरणाचा प्रश्न, संस्थेच्या शारदा चित्रपटगृह आणि नवी-जुनी इमारत पुनर्विकासाचा निर्णय, संस्थेचे आर्थिक नुकसान निविदा मागवून ग्रंथालयाच्या दुरुस्तीची आणि इतर कामे करणे, संस्थेचे विभाग आणि शाखांच्या वार्षिक अहवालाची प्रत ग्रंथालय कर्मचारी संघटनेला द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -