घरमहाराष्ट्रफ्रेबुवारी महिन्यात दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा

फ्रेबुवारी महिन्यात दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा

Subscribe

दहावीची परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून आता या मुख्य परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई विभागातील दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा ११ ते २८ फ्रेबुवारी दरम्यान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाची बारावीची परिक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर दहावीची परिक्षा १ मार्चपासून सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परिक्षा ११ फेब्रुवारी ते २० मार्च पर्यंत असणार असून दहावीची परिक्षा १ मार्च ते २२ मार्च दरम्यान होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला जोरदार सुरुवात केली असून आता या मुख्य परिक्षेपूर्वी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. यंदा मुंबई विभागातील हदावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ११ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

या दरम्यान होणार प्रात्यक्षिक परीक्षा

मुंबई विभागीय मंडळाच्या विज्ञान प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षा ११ ते २८ फ्रेबुवारी ते २८ फ्रेबुवारी दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या एकंदर भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच दहावीत शिकणारा कोणताही विद्यार्थी प्रात्यक्षिक किंवा व्यावसायिक प्रात्यक्षिक पीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी शाळा व्यवस्थापनाने घ्यायची आहे. याचीच दखल घेत शाळांनी दहावीसाठीच्या या प्रात्याक्षिक परीक्षांसाठी करत असलेल्या नियोजनाची प्रत विभागीय मंडळाला पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी शाळांना केल्या आहेत.

- Advertisement -

दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. विज्ञान प्रात्याक्षिक आणि व्यावसायिक परीक्षांच्या संदर्भात शाळांनी आपापल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना माहिती द्यावी आणि या परीक्षांच्या वेळापत्रकाच्या तारखांबाबत सूचित करावे.  – शरद खंडागळे, मुंबई विभागीय मंडळाचे सचिव


वाचा – दहावीच्या परिक्षेला बसणार १२ वर्षांची मुलगी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -