घरCORONA UPDATEमुंबईकर झाला बिनधास्त; मास्क न लावणाऱ्यांची संख्या वाढतेय

मुंबईकर झाला बिनधास्त; मास्क न लावणाऱ्यांची संख्या वाढतेय

Subscribe

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून प्रत्येक नागरिकाला मुखावरण अर्थात मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार करण्यात येणाऱ्या कारवाईत मास्क न लावता मुंबईकर बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच महिन्यात जिथे मास्क न लावता फिरणारे आढळून आले होते. त्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात अवघ्या २६ दिवसांमध्ये दुप्पट लोक आढळून आले आहे. एप्रिलपासून आतापर्यंत १४ हजार लोकांना मास्क न लावल्याप्रकरणी दंड करण्यात आला असून त्यातील ९ हजार लोक मागील १३ दिवसांमध्ये आढळून आले आहेत आणि या सप्टेंबर महिन्यातच तब्बल १९ लाख रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे.

कोरोनाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क लावणे महापालिकेने बंधनकारक केले होते. त्यानुसार मागील एप्रिल महिन्यात महापालिका आयुक्तांनी तसे निर्देश देत या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मागील एप्रिल महिन्यापासून मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरोधात धडक कारवाई सुरु आहे. त्यानुसार एप्रिल ते १२ सप्टेंबर या कालावधीत एकूण ४९८९ लोकांना पकडून दंडीत करण्यात आले. त्यामुळे या कालावधीत सर्वांकडून ३३ लाख ६८ हजार एवढा दंड वसूल झाला होता. परंतु त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या अवघ्या १३ दिवसांच्या कालावधीत ९२१८ लोकांना मास्क न लावल्याप्रकरणी दंड करण्यात आला. यासर्वांकडून १९ लाख ७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिलपासून २६ सप्टेंबर या कालावधीत एकूण १४ हजार २०७ लोकांकडून ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दंडात्मक कारवाईची आकडेवारी

एप्रिल ते १२ सप्टेंबर : एकूण दंड : ३३,६८,५०० रुपये (४९८९ प्रकरणे)

१३ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : २४,६०० रुपये (१११ प्रकरणे)

- Advertisement -

१४ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १,०३,६०० रुपये (४२४ प्रकरणे)

१५ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १, १६,२०० रुपये (४९७ प्रकरणे)

१६ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १,२७,००० रुपये (५०७ प्रकरणे)

१७ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १, १९,,६०० रुपये (५९८ प्रकरणे)

१८ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १,८१,००० रुपये (८९९ प्रकरणे)

१९ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १,७३,२०० रुपये (८६३ प्रकरणे)

२० सप्टेंबर २०२० : एकूण दंड : ६०,८०० रुपये (३०४ प्रकरणे)

२१ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : २, १२,५०० रुपये (१०६० प्रकरणे)

२२ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : २,१७,१०० रुपये (१०८६ प्रकरणे)

२३ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : ५५,००० रुपये (२८१ प्रकरणे)

२४ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १,८२,१०० रुपये (९१३ प्रकरणे)

२५सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १,८७,००० रुपये (९३५ प्रकरणे)

२६ सप्टेंबर २०२० : एकूण दंड : १,४८,००० रुपये (७४० प्रकरणे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -