घरमुंबईराज्य सरकारच्या ध्येयपूर्तीसाठी पालिका आयुक्तांच्या बैठका

राज्य सरकारच्या ध्येयपूर्तीसाठी पालिका आयुक्तांच्या बैठका

Subscribe

मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी निवडणुकीपूर्वी शहरातील सुशोभिकरणाची कामे, स्वच्छता, शौचालय समस्या मार्गी लावणे, रस्ते कामे आदी विकासकामे शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने हाती घेतली आहेत. या कामांना जलदगतीने चालना देऊन मुंबईकरांची मने जिंकून त्यांची मते मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन केले आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना सत्तेसाठी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबईतील सुशोभिकरणाच्या कामांबाबत घोषणा, जाहिरातबाजीद्वारे प्रचार व प्रसार सुरू आहे. त्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल हेदेखील  मुंबईतील विकास कामांबाबत संबंधित यंत्रणा, अधिकारी यांच्याकडून कधी प्रत्यक्ष तर कधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठका घेऊन आढावा घेत आहेत.
अशीच एक बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार यांच्यासह सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, सह आयुक्त / उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी निवडणुकीपूर्वी शहरातील सुशोभिकरणाची कामे, स्वच्छता, शौचालय समस्या मार्गी लावणे, रस्ते कामे आदी विकासकामे शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने हाती घेतली आहेत. या कामांना जलदगतीने चालना देऊन मुंबईकरांची मने जिंकून त्यांची मते मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन केले आहे.

- Advertisement -

आयुक्तांकडून या विकास कामांचा आढावा

मुंबईतील रस्त्यांची सातत्याने अधिकाधिक प्रभावी साफसफाई करण्याचे निर्देश.

- Advertisement -

नियोजित ५०० ठिकाणच्या सुशोभीकरणाच्या ठिकाणी पथदिवे व प्रकाशयोजना अधिक प्रभावी करणे.

पालिका अखत्यारितील पुलांची अधिक प्रभावी साफसफाई, आकर्षक रंगरंगोटी करणे व वाहतूक बेटांचेही सुशोभकरण करणे

येत्या २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सुशोभीकरण कार्यवाही करण्याचे निर्देश.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत सध्या कार्यरत ५२ दवाखान्यांच्या संख्येत येत्या २६ जानेवारीपर्यंत आणखी ५० ची भर टाकून त्यांची संख्या १०२ करणे

प्रत्येक विभागामध्ये सलग २४ तास शौचालये कार्यरत करून स्वच्छता राखणे

अति धोकादायक शौचालयांचे पुनर्बांधकाम त्वरित करणे

प्रत्येक विभागातील किमान एका ठिकाणी हायमास्ट दिवा बसविणे

अनधिकृत फलक व पोस्टर्सवर कठोर कारवाई करणे

ज्या ठिकाणी रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याची कामे सुरु आहेत तेथे रस्त्यांवरील वाहतूक सुरळीतपणे ठेवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -