Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai corona Update : मुंबईकरांना दिलासा, गेल्या २४ तासात ४३५ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai corona Update : मुंबईकरांना दिलासा, गेल्या २४ तासात ४३५ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत १४ जुलैत ते २० जुलै २०२१ पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर हा ०.०६ टक्क्यांवर आला आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात मागील २४ ताात ४३५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत १४ जुलैत ते २० जुलै २०२१ पर्यंत एकूण कोविड वाढीचा दर हा ०.०६ टक्क्यांवर आला आहे. यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण १५ हजार ७३९ कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये मागील २४ तासात १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ओसरताना दिसत आहे. आज रोजी मुंबईत एकूण ६ हजार २० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत मुंबई क्षेत्रात एकूण ७ लाक ३२ हजार ३४९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ७ लाख ८ हजार २१४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील २४ तासात मुंबईत ४३५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५ रुग्ण पुरुष व ८ रुग्ण महिला होते. १ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. ८ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित ४ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईत आजरोजी ७८ लाख ४१ हजार ६८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून मागील २४ तासात २९ हजार ३२० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर १ हजार ९७ दिवसांवर गेला आहे. यामुळे मुंबईतील कोरोन परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.

- Advertisement -