घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; ७३६ रुग्ण बरे

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; ७३६ रुग्ण बरे

Subscribe

शुक्रवारप्रमाणेच शनिवारी १३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली.

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबई महापालिका आणि प्रशासनाला काहीसे यश मिळताना दिसत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाली. शुक्रवारी मुंबईत ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, शनिवारी मुंबईत ५०४ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख २७ हजार १४१ इतकी झाली आहे. तसेच मृतांच्या संख्येत मात्र कोणताही बदल झाला नाही. शुक्रवारप्रमाणेच शनिवारी १३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १५ हजार ६१२ इतकी झाली आहे.

७३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले

तसेच आणखी एक समाधानकारक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती. शनिवारी ५०४ कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना ७३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ०१ हजार ७१० इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

रुग्ण दुप्पटीचा दर ९०९ दिवस

मुंबईत आज ३७ हजार ०३६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ५०४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत सध्या ७ हजार ४८४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच मुंबईत ३ जुलै ते ९ जुलै या कालावधीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.०७ टक्के इतका होता. तर रुग्ण दुप्पटीचा दर ९०९ दिवस इतका झाला आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -