Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 6 हजारांवर; बरे होणाऱ्यांचे प्रमाण घटले

mumbai corona update 6149 new corona patients found in mumbai last 24 hrs today 7 death omicron
Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 6 हजारांवर; बरे होणाऱ्यांचे प्रमाण घटले

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून १० हजारांच्या खाली पोहचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याचे म्हणता येईल. परंतु सोमवारी 5 हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या आज मात्र पुन्हा ६ हजारांवर पोहचली आहे. मात्र मृत्यांचे प्रमाण आज काहीसे घटले आहे. गेल्या 24 तासात मुंबई 6149 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 12810 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. काल हीच संख्या 15 हजार 551 इतकी होती. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटत आहे. आत्तापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 48 हजार 744 इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्के आहे.

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 9 लाख 35 हजार 934 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहचला आहे. तर रुग्ण दुपट्टीचा दर 61 दिवसांवर गेला आहे.

तर आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या ही 16 हजार 476 इतकी आहे. मुंबईत आज एकूण 48 हजार 700 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 147,17,804 इतकी झाली आहे. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी केवळ 575 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील 95 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेडवरील आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाण आज मात्र वाढले आहे. 10 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान कोरोना रुग्ण वाढीचा दर हा 1.10 टक्के इतका झाला आहे. मुंबईत सध्या शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 52 सक्रीय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईतील ओमिक्रॉनची लाट ओसरली; उर्वरित भारतात मार्चमध्ये प्रभाव होईल कमी

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनची लाट मुंबईत ओसरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु देशभरातील उर्वरित भागात कोरोना महामारीची तिसरी लाट कमी होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागू शकतो. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, “कोरोना महामारीबद्दल सांगायचे झाल्यास, काही युरोपीय देशांनी 2020 ते 2022 दरम्यान कोरोनाच्या सुमारे पाच लाटांची नोंद केली आहे आणि ही लाट पुढेही सुरु राहिलं. मात्र या लाट 2020 प्रमाणे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम करणारी नसेल असे म्हटले जाते. मात्र हे कोरोना व्हेरिएंटच्या म्यूटेशनवर अवलंबून असेल.

देशात सोमवारी ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 8,891 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत ओमिक्रॉन व्हेरिएंट रुग्णांमध्ये 8.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पुढील 14 दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचे

कोरोना महामारीवर अभ्यास करणारे डॉ गिरीधर बाबू म्हणाले की, “विविध गणितीय मॉडेल्सच्या आधारे, भारतात ओमिक्रॉनची लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत राहील.” ओमिक्रॉन लाटेला त्याच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सामान्यत: तीन आठवडे लागतात. मात्र डेल्टाच्या लाटेपेक्षा या आोमिक्रॉन लाटेचा वेग तिप्पट आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे संपूर्ण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत

भारतातील महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, मार्च आणि एप्रिलनंतर व्हेरिएंटमुळे चिंतेचे कोणतेही कारण समोर आले नाहीत, तर महामारी कमी होण्याची शक्यता आहे. मार्च किंवा एप्रिल नंतर लहान किंवा सौम्य उद्रेकांसह संकटमुक्त जगाची अपेक्षा करू शकतो,” असेही ते म्हणाले.


१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त, ३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन