घरमुंबईमुंबईतील सोनसाखळीचे गुन्हे घटले

मुंबईतील सोनसाखळीचे गुन्हे घटले

Subscribe

मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांची पीछेहाट

काही वर्षांपूर्वी सोनसाखळी चोरांनी मुंबईत अक्षरश: धुडगूस घालून पोलिसांना सळो की पळो करून सोडले होते. या सोनसाखळी चोरांमुळे महिलांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले होते.परंतु, मुंबई तसेच ठाणे पोलिसांनी या टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून त्याची चहुबाजूंनी नाकाबंदी केल्यामुळे मुंबईतील सोनसाखळीच्या गुन्ह्यांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या आडकेवारीवरून समोर आले आहे. परंतु सोनसाखळी चोरावर अंकुश लावण्यात मुंबई पोलिसांना जरी यश आले असले तरी या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मालमत्ता हस्तगत करण्यात पोलीसांना अपयश आल्याचे समोर येत आहे.

सोनसाखळी चोरांवर अंकुश लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक प्रयोग केले होते. मात्र सर्व प्रयोग फोल ठरले होते. अखेर मुंबईत जागोजागी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, प्रतिबंधक कायदा,मोक्कासारख्या कायद्याचा वापर करण्यात आल्यानंतर या टोळ्यांवर बर्‍यापैकी नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

२०१३ ते २०१८ या दरम्यान मुंबईत झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची आकडेवारी माहितीच्या अधिकाराखाली आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागवली असता या गुन्ह्यांत बर्‍यापैकी घट झालेली दिसून येत आहे.

आकडेवारी

- Advertisement -

वर्ष गुन्हे दाखल गुन्हे उकल === == वर्ष चोरी मालमत्ता जप्त मालमत्ता
२०१३ २०९० ७९३ ======== २०१३ १३,९५,३७,९८७ २,४०,४२,२६८

२०१४ १४०९ ६४८ ======== २०१४ ९,८७,२५,६४४ १,७८,९४,६५५

२०१५ ९०९ ४१९ ======== २०१५ ५,९२,१३,७०० १,५२,७८,१६०

२०१६ ४४५ २४५ ======== २०१६ २,९६,३०,३८० ६४,६८,१६०

२०१७ १६९ ११३ ======== २०१७ १,२४,१९००० ४१,०५,४५६

२०१८ १७१ १२० ======== २०१८ १,२०,४४०० ३४,७९,३३१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -