घरमुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला नवा लूक!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला नवा लूक!

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकाला १३२ वर्षे पूर्ण

सर्वात स्वस्त दरात उपलब्ध असलेली सेवा म्हणजे रेल्वे सेवा होय. आज अशाच एका लोकप्रिय आणि ऐतिहासिक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला १३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशातील सर्वात जास्त रहदारी या स्थानकात असते. या स्थानकात परिवर्तन केले गेले आहे. चांगली प्रकाशयोजना, आधुनिक सोयी-सुविधा केल्या आहेत. खास करुन प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा आणि पादचारी पुल अधिक सुरक्षित करणे हा या परिवर्तन करण्यामागचा उद्देश होता.

पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनस संबोधले जात होते. कारण व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंती निमित्ताने हे स्थानक बांधले गेले होते. तसेच या स्थानकाला यूनेस्कोने जागतिक वारसा स्थान देखील घोषित केले आहे.

- Advertisement -

अहवालानुसार, या मोहिमेत बीएमसी, वाहतूक पोलीस आणि ग्लोबल रोड सेफ्टीसाठी ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह यांचा समावेश आहे. तसेच प्रमुख रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी देखील सुधारणा करणार आहे.

संपूर्ण देशात रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. तसेच रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधा, स्टेशनवरील स्वच्छता यात सुधारणा करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वे करीत आहे. उत्तम प्रकाशायोजनेसाठी एलईडी लाइट्स बसवल्या जाणार आहेत. तसेच रेल्वे स्थानकावर असलेल्या इतर रुममध्ये सीसीटीव्ही देखील बसवले जाणार आहेत आणि स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरातील वातावरण आणि आधारभूत सुविधांमध्ये देखील सुधारणा भारतीय रेल्वे करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -