घरमुंबईCoronavirus in Mumbai: मुंबईत दोन डोस घेणाऱ्यांना कोरोनाची लागण!

Coronavirus in Mumbai: मुंबईत दोन डोस घेणाऱ्यांना कोरोनाची लागण!

Subscribe

राज्यभरासह मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोना बाधितांमध्ये मुंबईतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतानाही लोकांना कोरोनाची लागण होत आहे. ही जरी चिंताजनक बाब असली तरी चांगली बातमी म्हणजे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी झाल्याचे समोर आले आहे. बीएमसी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी आतापर्यंत कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यापैकी ७ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईमध्ये २६ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाने कोरोना डोस घेतल्यानंतरही कोरोना बाधित असल्याचे आढळून आले, त्यानंतर बीएमसीचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे बीएमसीने कोरोना संक्रमित रुग्णांशी संबंधित माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती.

कोरोना झालेल्या रुग्णांच्या संदर्भात मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड वॉर रूममध्ये डेटा गोळा केला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, दोन्ही कोरोना लसीचे डोस घेतलेल्या तब्बल ७ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. जरी या ७ हजार लोकांपैकी काही लोकांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे तर काहींमध्ये मध्यम लक्षणे दिसू आले असले तरी त्यांच्यापैकी काहींना ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. तर काही लोकं इतर रोगांनी देखील ग्रस्त होते.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाचा एक डोस घेतलेल्या लोकांची माहिती वॉर्ड वॉर रूममधून गोळा केली जात आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रूग्णांची मागील हिस्ट्री देखील तपासली जात आहे. दोन्ही डोस घेतलेल्या कोणत्याही संक्रमित व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची ही दिलासा देणारी बाब देखील या परिस्थितीत समोर आली आहे. यासह डेटा गोळा करण्याचे काम सुरू राहणार असून आतापर्यंत बाधित लोकांची संख्येत ४५ वरील वयोगटातील लोकं जास्त असल्याची माहिती देखील बीएमसीकडून देण्यात आली आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -