घरमुंबईमुंबईत २२ व्या मजल्यावर अडकला मनोरुग्ण; अग्रिशमन दलाने वाचविले प्राण

मुंबईत २२ व्या मजल्यावर अडकला मनोरुग्ण; अग्रिशमन दलाने वाचविले प्राण

Subscribe

कांदिवली (पूर्व) येथील सरोवर साहेब टाॅवरच्या ए विंग येथे ही घटना घडली. २२ मजल्यावरील गॅलरीच्या बाह्य कठड्यावर  ७० वर्षीय मनोरुग्ण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यामुळे तातडीने अग्रिशनम दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथे बघ्यांचीही गर्दी झाली होती. अग्रिशमन दलाने त्या मनोरुग्णाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. खिडकीचा दरवाजा उघडून तो मनोरुग्ण चिंचोळ्या जागेत जाऊन बसला होता.

मुंबईः कांदिवली येथे २२ व्या मजल्यावर अडकलेल्या मनोरुग्णाला वाचवण्यात अग्निशमन दलाला रविवारी यश आले. मनोरुग्णाला वाचवण्याचा थरार थक्क करणारा होता. मात्र अग्रिशमन दलाचे जवान राजदास राठोड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनोरुग्णाचे प्राण वाचविले.

कांदिवली (पूर्व) येथील सरोवर साहेब टाॅवरच्या ए विंग येथे ही घटना घडली. २२ मजल्यावरील गॅलरीच्या बाह्य कठड्यावर  ७० वर्षीय मनोरुग्ण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यामुळे तातडीने अग्रिशनम दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथे बघ्यांचीही गर्दी झाली होती. अग्रिशमन दलाने त्या मनोरुग्णाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. खिडकीचा दरवाजा उघडून तो मनोरुग्ण चिंचोळ्या जागेत जाऊन बसला होता. त्याला काही सुचना करणे किंवा काही सांगणे कठीण होते. मदतीसाठी हात दिल्यास त्याच्याकडून काय प्रतिसाद मिळेल याचा अंदाज अग्रिशमन दलाला  नव्हता. कारण एक चुक त्या मनोरुग्णाच्या जीवावर बेतणारी ठरु शकत होती.

- Advertisement -

अखेर अग्रिशमन दलाचे जवान राजदास राठोड यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने त्या चिंचोळ्या जागेत उतरण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेची सर्व तयारी करुन राठोड त्या चिंचोळ्या जागेत उतरले. सावधपणे त्या मनोरुग्णाच्या जवळ गेले. तो मनोरुग्ण तेथून उठण्याचीही मनस्थितीत नव्हता. अखेर राठोड यांनी त्याला उचले. त्याला खिडकीजवळ नेले व सुरक्षितरित्या त्याला खिडकीतून आत ढकले. त्यावेळी अन्य अग्रिशमन जवानांनी त्या मनोरुग्णाला खेचून आत ओढले. या बचाव कार्यात राठोड यांच्या जीवालाही धोका होता. मात्र त्यांनी केलेल्या धाडसामुळे त्या मनोरुग्णाचे प्राण वाचू शकला.

हा थरार बघताना सर्वजण थक्क झाले होते. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हे बचावकार्य झाले. मात्र हे बचावकार्य खरेखुरे होते. मनोरुग्ण बचावल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पाडला. तसेच राठोड यांच्या धाडसाचेही कौतुक जाले. मात्र तो मनोरुग्ण तेथे कसा पोहोचला. त्याच्या सोबत कोणी होते का. याचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -