घरमुंबईमुंबईत आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकल नियमित धावणार

मुंबईत आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकल नियमित धावणार

Subscribe

मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने मुंबईकर खरेदीसाठी घरा बाहेर पडत आहेत. त्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. आज रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते भायखळा या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

आज सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने आज 110 लोकल गाड्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर आज शेवटचा ब्लॉक घेण्यात आला असून उद्यापासून  पश्चिम रेल्वे मार्गावर फेऱ्या नियमित धावणार आहे. या सहाव्या मार्गिकेसाठी 27 ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेच्या 316 लोकलपैकी 204 लोकल रद्द केल्या होत्या. यामुळे पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पण पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकचा आज शेवटाचा दिवस आहे. उद्यापासून पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर फेऱ्या नियमित धावणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवासांसाठी दिलासादायक बातमी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काय लागू शकतो पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल? वाचा, सर्वेक्षणाचा अंदाज

मध्य रेल्वे मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते भायखळा या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर माटुंगा आणि भायखळादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून येणाऱ्या अप मेल किंवा एक्स्प्रेस रेल्वे मागड्या या माटुंगा ते भाखळादरम्यान अप धीम्या मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे लोकल गाड्या नियमित वेळापासून 10 ते 15 मिनिटे उशीराने धावणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंनी दिली एसटी संपाची हाक, पण कर्मचारी देणार का साथ?

हार्बर मार्गावर असा असणार मेगाब्लक

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर आज सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेल-बेलापूर आणि पनवेल-बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या धावणार नाही. या मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला या स्थानकादरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -