घरमुंबईVideo : बैलांच्या झुंजीत तरुण जखमी

Video : बैलांच्या झुंजीत तरुण जखमी

Subscribe

दोन बैलांच्या भांडणात विद्यार्थ्याला उडवल्याची घटना पवईमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दोन बैलांच्या भांडणात विद्यार्थ्याला उडवल्याची घटना समोर आली आहे. पवई येथील आयआयटी येथे ही घटना घडली असून या घटनेमध्ये विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्याला विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय लथा असर असे या विद्यार्थ्याचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृत्ती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

पवई येथील आयआयटी गेट नंबर ९ समोर आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गेटवर उभा असून तो आपल्या मोबईलमध्ये काहीतरी बघत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अचानक त्यावेळी दोन बैल धावत येऊन त्या विद्यार्थ्याला धडकतात आणि या धडकेमध्ये विद्यार्थी खाली कोसळतो. या दोन बैलांच्या मारामारीचा फटका या तरुणाला बसतो. ही धडक इतकी भीषण असते की या धडकेमध्ये हा तरुण काही कोसळतो आणि त्यात तो जखमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -