घरमुंबईशाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिका संभ्रमात?

शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिका संभ्रमात?

Subscribe

ठोस निर्णय नसताना विद्यार्थ्यांसाठी २० कोटींची मास्क खरेदी

राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत सूतोवाच केले आहे. मात्र, याबाबत बृहन्मुंबई महापालिका प्रशासन संभ्रमात आहे. शाळा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय झाला नसताना विद्यार्थ्यांसाठी २० कोटींची मास्क खरेदीची घाई प्रशासन करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पंकज यादव यांनी गुरुवारी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा मांडत शाळा सुरु करणे, मास्क खरेदीबाबत सद्यस्थिती सादर करण्याची मागणी केली. शैक्षणिकदृष्ट्या कोणताही महत्वाचा निर्णय घेताना महापालिका प्रशासनाकडून शिक्षण समितीला अंधारात ठेवले जात आहे. राज्य शासनाने २७ जानेवारी पासून शाळा सुरू होतील असे जाहीर केले आहे. मात्र, याबाबत महानगरपालिकेने नेमकी काय तयारी केली आहे. याची माहिती शिक्षण समितीत देणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा शिक्षण समिती सदस्य प्रतीक करपे यांनी व्यक्त केली.

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणावर असेल याची स्पष्टता होणे गरजेचे आहे. तसेच किती शिक्षकांचे लसीकरण केले जाणार आहे. याबाबत तपशीलवार माहिती शिक्षण समिती सदस्यांना दिली जावी. शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे का? विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत वैद्यकीय तज्ञांची मते घेतली आहेत का?, शाळांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन होणार का? त्याबाबत महापालिका प्रशासनाने कोणती पूर्वतयारी केली आहे असे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी बैठकीत उपस्थित केले आहेत. यावेळी नगरसेविका बिंदू त्रिवेदी, श्रीकला पिल्ले, नेहल शहा, अनुराधा पोतदार, सुरेखा पाटील यांनी हरकतीच्या मुद्द्याला पाठींबा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -