घरमुंबईपालिकेच्या ऐतिहासिक निर्णयाची शंभरी

पालिकेच्या ऐतिहासिक निर्णयाची शंभरी

Subscribe

महिलांना राजकारणात निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आलेल्या या निर्णयाला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षांचे महत्व लक्षात घेता महापालिकेतील नगरसेविकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला आहे.

गव्हर्नर इन काउन्सिलने नोव्हेंबर १९१८ मध्ये मंजूर केलेल्या ठरावानुसार महिलांना निवडणूक लढविण्याचा हक्क प्रदान करण्यात आला. त्या संधीचा फायदा घेत त्यानंतरच्या सन १९२२ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक मान्यवर महिला महापालिकेवर निवडून आल्या. या महिलांना राजकारणात निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आलेल्या या निर्णयाला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षांचे महत्व लक्षात घेता महापालिकेतील नगरसेविकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला आहे.

महिलांना निवडणूक लढवण्याचा हक्क प्रदान करण्याच्या ठरावाला शंभर वर्षे पूर्ण

महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी महिलांना निवडणूक लढवण्याचा हक्क प्रदान करण्याच्या ठरावाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महापालिका प्रशासनाने हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची मागणी केली. नोव्हेंबर १९१८ रोजी गव्हर्नर इन काउन्सिलने मंजूर केलेल्या ठरावानुसार महिलांना निवडणूक लढवण्याचा हक्क प्रदान करण्यात आला. या संधीचा फायदा घेऊन त्यानंतर सन १९२२ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूक लढवून सुलोचनाबेन मोदी, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी यासारख्या महिला पहिल्यांदा महापालिकेवर निवडून आल्या आणि आज अनेक महिला समाजकार्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. सन१९१८मध्ये एक ठरावपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आला होता. या घटनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून महापालिका प्रशासनाने हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची आवश्यकता असल्याचे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेत मंजुर करून आयुक्तांकडे अभिप्रायसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, आयुक्तांनी याबाबतचा कार्यक्रम करण्यास अनुकूलता दर्शवली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिका प्रशासनाला चूक कळली,निधी चौधरी सहआयुक्तच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -