घरमुंबईमागील दोन वर्षांच्या तुलनेत तलावांच्या पाण्याची पातळी वाढली

मागील दोन वर्षांच्या तुलनेत तलावांच्या पाण्याची पातळी वाढली

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमधील पाणी साठ्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असून सध्या या सर्व तलावांमधील पाण्याचा साठा ८५.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमधील पाणी साठ्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असून सध्या या सर्व तलावांमधील पाण्याचा साठा ८५.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागू राहिली होती. परंतु जुनच्या शेवटच्या आठवड्यात बसरणार्‍या पावसामुळे एका महिन्यातच मागील वर्षांच्या तुलनेत पाण्याची पातळी आणि त्यातील साठा वाढला आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यात यासर्व तलावांमध्ये पाण्याचा साठा अवघा ७ टक्के एवढा होता.

या तलावांमध्ये १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलावांमध्ये मंगळवारी ३१ जुलै रोजी १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला वर्षभरासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढा पाणी साठा अपेक्षित असतो. त्यातुलनेत हा पाणी ८५.६८ टक्के एवढा जमा झाला आहे. सन २०१८ आणि सन २०१७ मध्ये ३० जुलैपर्यंत अनुक्रमे ८३.३० टक्के आणि ८६.४४ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला होता. आतापर्यंत तुळशी, तानसा, मोडकसारग या तलावांपाठोपाठ भातसा आणि मध्य वैतरणा आदी तलावांमधील पाण्याची पातळी काठोकाठ आल्याने त्यांचे काही गेट खुले करण्यात आले आहेत. तर विहार तलाव काठोकाठ भरला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आजच हा तलाव ओसंडून भरून वाहू लागेल. कारण तलाव भरण्यासाठी केवळ अर्धा मीटर पाण्याची पातळी कमी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ‘ओव्हर फ्लो’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -