घरमुंबईमुंबई पोलिसांना मोठे यश; तीन कुख्यात चोर गजाआड

मुंबई पोलिसांना मोठे यश; तीन कुख्यात चोर गजाआड

Subscribe

६२ लाख रुपयांच्या लूटप्रकरणी तीन मुख्य आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपींकडून दहा लाख रुपयांसह चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आह.

खार येथे दिवसाढवळ्या एका फ्लॅटमध्ये घुसून ६२ लाख रुपयांची मालमत्ता लंपास करणाऱ्या चोरांना पोलिसांनी अटक केले आहे. विशेष म्हणजे घरात एक महिला आणि तीचे दोन मुले होती. या चोरांनी कुरिअरचा बहाना करत घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी धारधार शस्त्रांचा धाक दाखवत महिला आणि मुलांना ओढणीने बांधले आणि त्यांना एका खोलीत डांबले. मोहम्मद सोहेल मुनेद्दीन अन्सारी, मंजुर अब्दुल अहमद शेख ऊर्फ कालिया आणि रफिकअली कुतुबअली मोहम्मद अक्रम इसाक सिद्धीकी ऊर्फ पतलू अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांकडून पोलिसांनी दहा लाख रुपयांची कॅश आणि पाच ते सहा मोबाईल जप्त केले आहेत. या तिघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले होते. त्यात मोहम्मद वारीश मोहम्मद आरिफ शेख, मोहम्मद अक्रम अब्दुल समर इंद्रीसी आणि सुजीतकुमार जयवंत ठाकूर यांचा समावेश होता. या गुन्ह्यात वशीर अली अहमद या आरोपीला वॉण्टेड घोषित करण्यात आले असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमकं काय आहे प्रकरण?

कोहीनूर नादीरअली सय्यद ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत खार परिसरातील भूमी गोविंद अपार्टमेंटमध्ये राहते. ५ सप्टेंबरला तिच्या घरी कुरिअर देण्याचा बहाणा करुन तीन अज्ञात तरुणांनी प्रवेश केला. या तिघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून या तिघांना ओढणीने एका रुममध्ये बांधून ठेवले. त्यानंतर कपाटातील सुमारे ६० लाख रुपयांची कॅश, १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांचा एक मोबाईल असे एकूण सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले.

- Advertisement -

पोलिसांनी असा लावला तपास

याप्रकरणी खार पोलिसांत तक्रार दाखल होताच २२ ऑक्टोंबरला मोहम्मद वारीश, मोहम्मद अक्रम आणि सुजीतकुमार ठाकूर या तिघांना पोलिसांनी अटक केले होते. या तिघांच्या चौकशीमध्ये त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यांनी त्यांच्या इतर चार साथीदारांची नावे सांगितले होते. पोलिसांनी शोधमोहीम सुरु करुन यातील मोहम्मद सोहेल याला हिमाचल प्रदेश, मंजुर शेख याला मालवणी तर रफिकअली सिद्धीकी याला उत्तर प्रदेशातून अटक केले. सध्या वशीर अलीचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांनी चोरी केलेली रक्कम आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.


हेही वाचा – चोरी केल्याचा मिळतो पगार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -