घरताज्या घडामोडीwrongsidedriving: बेशिस्त मुंबईकरांविरोधात पोलीस आयुक्त म्हणतात, जुनी खोड...

wrongsidedriving: बेशिस्त मुंबईकरांविरोधात पोलीस आयुक्त म्हणतात, जुनी खोड…

Subscribe

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी येत्या दिवसात मुंबईत सुरू असलेल्या मोहिमेचा गिअर शिफ्ट करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाबाबतच्या कारवाईचा वेग आणखी वाढणार असल्याचे त्यांनी एक ट्विट करत स्पष्ट करत दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील वाहतुकीच्या उल्लंघनाच्या कारवाया सुरू केल्या होत्या. त्यामध्ये विरूद्ध दिशेने चालवण्यात येणारी वाहने, कर्कश्श हॉर्न वाजवणे, हेल्मेट घातलेले नसणे, ड्रग आणि गुटखा खाण्याशी संबंधित केसेसचा समावेश होता. जुनी खोड जात नाही अशा शब्दात मुंबई पोलीस आयुक्तांनी शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सुनावले आहे.

- Advertisement -

मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांना शहरात पोलिसांकडून कोणत्या प्रकारच्या सुधारणांची गरज आहे ? याबाबतची विचारणा केली होती. त्यानंतर मुंबईतील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्याशेजारील वाहनांना स्क्रॅप करत हटवण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या मदतीने हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भंगार वाहनांचा अडथळा दूर करण्यात आला होता.

आता नव्याने हाती घेण्यात आलेल्या विरूद्ध दिशेच्या वाहतुकीच्या मोहिमेत २३२ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. हेल्मेट नसलेल्या १६८८ दुचाकीस्वारांना दंड आकारण्यात आला आहे. तर १४० केसेसमध्ये विनाकारण हॉर्न वाजवण्याच्या प्रकरणात दंड आकारणी करण्यात आली आहे. तर ५ ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये ५ लाख रूपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. गुटखा फ्री प्रकरणात १.८ लाख रूपयांची कारवाई करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पण या कारवाई व्यतिरिक्त येत्या काळात ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -