घरमुंबईखाकी वर्दीला सलाम! आत्महत्या करण्यास निघालेल्या विवाहितेचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

खाकी वर्दीला सलाम! आत्महत्या करण्यास निघालेल्या विवाहितेचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

Subscribe

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गौरव केला.

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांच्या शौर्याचा अनेक घटना समोर येत असतात. भीषण बॉम्बस्फोट, दंगली, गुन्हेगारीच्या परिस्थितीतही शहर शांत ठेवण्यास पोलीस झटत असतात. एवढेच नाही तर अगदी कौटुंबिक, वैयक्तिक वादांची प्रकरणेही मुंबई पोलीस अगदी योग्य पद्धतीने हाताळून मिटवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका प्रकरणात आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणीचे प्राण वाचल्यामुळे मुंबईतील ताडदेव पोलिसांचे कौतुक होत आहे. या विवाहित तरुणीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणाऱ्या ताडदेव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गौरव केला. याप्रसंगी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबईच्या ताडदेव परिसरात सोमवारी सकाळी २० वर्षीय विवाहित तरुणीतस आत्महत्या करण्यापासून ताडदेव पोलिसांनी परावृत्त केले. म्हाडा वसाहतीच्या इमारतीच्या गच्चीवरून एक विवाहित तरुणी कौटुंबिक वादामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोलिसांनी तातडीनं याठिकाणी धाव घेत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ती तरुणी काही ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हती. त्त्यामुळे रागाच्या भरामध्ये इमारतीवरून खाली उडी मारत तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता.

यावेळी पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न करत आधी तिला शांत केले. यानंतर नामी शक्कल लढवत तिला बोलण्यात गुंग करत आत्महत्येचा निर्णयापासून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि गच्चीवरून खाली उतरवण्यात आलं, त्यामुळे थोडक्यात हा अनर्थ टळला. मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिची समजूत काढत समुपदेशनही केलं. ही तरुणी आता सुरक्षित असून कुटुंबाबरोबर असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी या तरुणीचा प्रेमविवाह झाला, सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबियांकडून तरुणीचा छळ केला जात होता. यामुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -