घरमुंबईडोळे फाडून मि. बीन जागा राहिला; तुम्ही तसं केलं तर...

डोळे फाडून मि. बीन जागा राहिला; तुम्ही तसं केलं तर…

Subscribe

डोळे उघडे ठेवण्यासाठी त्यांना काठ्या लावून ठेवणं आणि गाडी चालवणं धोक्याच ठरू शकतं, असा संदेश मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटरवर दिला आहे.

मुंबई ट्रॅफिक पोलीस वाहतुकीच्या नियमांबाबत नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करताना दिसताता. आपल्या मुंबई पोलीस या ट्विटर हँडलवर सिनेकलाकारांच्या फेमस डायलॉग आणि फोटोंचा वापर ते यासाठी करतात. असाच एक मजेशीर पण तितकाचं गंभीर विषय त्यांनी आज ट्विटरवर मांडला आहे. हॉलिवूडचा सुपरस्टार कॉमेडियन मि. बीन यांच्या अवलिया गोष्टींचा वापर त्यांनी चांगला संदेश देण्यासाठी केला आहे. डोळे उघडे ठेवण्यासाठी त्यांना काठ्या लावून ठेवणं आणि गाडी चालवणं धोक्याच ठरू शकतं, असा संदेश त्यांच्या ट्विटरवर दिला आहे. आपली झोप पूर्ण करा आणि मगच गाडी चालवा, असे त्यांनी ट्विटर पोस्टसोबत लिहिले आहे. गाडी चालवताना होणारे अपघात टाळण्यासाठी हा महत्त्वाचा संदेश त्यांनी अशा मजेशीर पद्धतीने दिला आहे.

- Advertisement -

हटके ट्विट्सच्या माध्यमातून जनजागृती 

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर यापूर्वीही हटके पद्धतीने जनजागृती केल्याचे आपण पाहिले आहे. शहरात वाढत चाललेल्या अपघातांचे प्रमाण पाहता ट्रॅफिक पोलीस नेहमीच सतर्कतेचे संदेश देतात.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -