घरमुंबईसोशल मीडियावरच्या रोमियोंपासून सावधान! मुंबई पोलिसांचा मिम्सद्वारे संदेश

सोशल मीडियावरच्या रोमियोंपासून सावधान! मुंबई पोलिसांचा मिम्सद्वारे संदेश

Subscribe

काही इंटरेस्टींग मिम्सद्वारे मुंबई पोलिसांनी महिलांना सुरक्षेसंबधी सूचना दिल्या आहेत. सोशल मीडियावरील रोमियो कसे ओळखावेत? अशा रोमियोंना भेटल्यावर काय करावे? यासंबधी पोलिसांनी मिम्सद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई पोलीस त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन नेहमीच काहीतरी इंटरेस्टिंग ट्वीट करत असतात. अनेकदा ते मिम्सद्वारे संदेश देऊन जनजागृती करताना पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘हॅलो फ्रँड्स, चाय पिलो’ आंटीच्या व्हिडिओद्वारे ‘हेल्मेट पहन लो’ असा संदेश दिला. त्यानंतर धडक सिनेमावरील व्हायरल मिमद्वारे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. आता मुंबई पोलिसांनी अनोख्या कार्टून मिमद्वारे महिलांना ‘सोशल मीडियावरच्या रोमियोंपासून सावधानतेचा’ इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे. ट्वीटसाठी वापरण्यात आलेले मिम्स इतर सोशल मीडिया साईट्सवरही व्हायरल होत आहेत. पोलिसांनी महिलांना सोशल मीडियावरील रोमियो कसे ओळखावेत? आणि असे रोमियो सोशल मीडियावर तुम्हाला भेटले तर काय करायला हवे? हे देखील पोलिसांनी महिलांना सांगितले आहे. हे रोमियो तुमच्याशी ओळख करण्यासाठी, जवळीक साधण्यासाठी काय करु शकतात? याची काही उदाहरणेही मुंबई पोलिसांनी दिली आहेत.

पाहा मुंबई पोलिसांनी तयार केलेले मिम

mumbai police twitter
मुंबई पोलिसांचे मिम

कोणत्याही मुलाने तुम्हाला ‘हेय देयर, नाईस डीपी डियर’ असा मेसेज करत तुमच्या प्रोफाईलवरील फोटोंचे कौतुक केले तर लगेच त्याला ब्लॉक करा. तो मुलगा तुमचे कौतुक करुन तुमच्याशी अधिक ओळख करु पाहतोय. त्याच्यापासून लांब राहा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

- Advertisement -
mumbai police twitter
मुंबई पोलिसांचे मिम

दुसऱ्या मिममध्ये असे सांगितले आहे की, कोणत्याही अनोळखी माणसाला तुमचा पत्ता देऊ नका. पत्ता मागणाऱ्यांपासून सावधान राहा. ‘हे, आय एम इन युअर सिटी, गिव्ह मी युअर अॅड्रेस, वुई विल हँगाऊट समटाईम’, अशा प्रकारचे मेसेज करणाऱ्याला ब्लॉक करुन त्याची माहिती पोलिसांना द्या.

mumbai Police twitter
मुंबई पोलिसांचे मिम

जे लोक रिप्लाय देण्यासाठी तुमच्या सतत मागे लागतात अशा लोकांपासून सावध राहण्याचा संदेश दिला. सतत मागे लागणाऱ्या अशा रोमियोंनादेखील ब्लॉक करण्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे.

- Advertisement -

 


मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटमध्ये गंमतीने असेही म्हटले आहे की, ‘तुम्हाला सोशल मीडियावर जर रोमियो भेटले, तर तुम्ही त्यांची माहिती आम्हाला द्या. आम्ही त्या रोमियोंच्या भावनांची पुरेपूर काळजी घेऊ!’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -