घरमनोरंजनजॉन अब्राहिमचा 'सत्यमेव जयते' : सिनेमाचा ट्रेलर रिलीज

जॉन अब्राहिमचा ‘सत्यमेव जयते’ : सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Subscribe

जॉन अब्राहिमच्या 'सत्यमेव जयते' या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.

अभिनेता जॉन अब्राहमच्या नुकत्याच येऊन गेलेल्या ‘परमाणु’ सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. सिनेमातील जॉनच्या अभिनयाचं सर्व स्तरांतून भरभरुन कौतुकही करण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ आता पुन्हा एकदा जॉन प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी याचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे. सत्यमेव जयतेचा ट्रेलर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून त्याचं नेटिझन्सकडून कौतुक होत आहे. विशेषत: जॉन अब्राहिमच्या चांहत्यांकडून या ट्रेलरचं कौतुक होताना दिसत आहे. परमाणुच्या यशानंतर ‘सत्यमेव जयते’च्या ट्रेलरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या असणार हे नक्की.

भ्रष्टाचार विरोधातला लढा

सत्यमेव जयते या चित्रपटात जॉनने एका सिरिअल किलरची भूमिका साकारली आहे. मात्र, हा सिरिअल किलर देशात होणाऱ्या भ्रष्टाविरोधात लढा देणारा आहे. पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी त्याची लढाई सुरु होते. या लढाईमध्ये अडथळा आणणाऱ्यांना संपवता संपवता जॉन अखेर खाकी वर्दीच्याच विरोधात उभा राहतो. त्याच्या या संपूर्ण लढ्यामध्ये मनोज वाजपेयीचा देखील एक महत्वाचा रोल आहे. सिरिअल किलर असलेल्या जॉनला शोधणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मनोज वायपेयीने साकारली आहे. ट्रेलर पाहताना आपल्याला मनोज वायपेयी आणि जॉन यांचा दमदार अभिनय पाहायला मिळतो.

- Advertisement -

३ चित्रपट एकाच दिवशी

अॅक्शन आणि ड्रामा यांची भरमार असलेला  ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी अर्थात येत्या १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. मात्र, याच तारखेला गोल्ड आणि यमला पगला दिवाना हे दोन चित्रपटही रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉक्सऑफिसवर या तिन्ही चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार हे निश्चीत. दरम्यान एकाच दिवशी ३ चित्रपट रिलीज होत असल्यामुळे प्रेक्षकांसाठी मात्र ही मेजवानी ठरणार आहे.

पाहा ट्रेलर :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -