घरमनोरंजनआला 'चुंबक'चा टीझर

आला ‘चुंबक’चा टीझर

Subscribe

अक्षयने 'चुंबक' या सिनेमाचे पोस्टर शेअर करत ‘एकापेक्षा एक कॅरेक्टर बाळू, डिस्को आणि प्रसन्ना’ असा उल्लेख केला होता. या सगळ्या कॅरेक्टरचे विशेष देखील या पोस्टरमधून बघायला मिळणार आहे, असं म्हटलं होतं आता या सिनेमचा टीझर लाँच झाला आहे.

अक्षय कुमारची निर्मिती असलेला मराठी सिनेमा ‘चुंबक’चं टीझर आज लाँच झाले आहे. अक्षय कुमारने स्वत: त्याच्या सोशल अकाऊंटवरुन या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. हा सिनेमा येत्या २७ जुलैला रिलीज होणार असून या आधी ७२ मैल एक प्रवास या सिनेमाची निर्मिती अक्षयने केली होती.  या सिनेमानंतर आता हा सिनेमा नक्की कसा असेल? अशी उत्सुकता  आहे. पण ही उत्कंठा तशीच ठेवत या सिनेमाचं टीझर लाँच करण्यात आले आहे.

असा आहे सिनेमाचा टीझर

सिनेमाचा टीझर काय असेल अशी उत्सुकता होती. आज अखेर या सिनेमाचा टीझर लाँच झालं आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये स्वानंद किरकिरे आणि एका लहान मुलासोबत बसच्या खिडकीसाठी वाद घालताना दिसत आहे. म्हणजे हा शाब्दिक वाद नाही. तर खिडकी मागे पुढे करताना दिसत आहे. शेवटी दोघेही खिडकी मधोमध ठेवतात आणि टीझर संपतो. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच धमाल करणार हे मात्र नक्की!

- Advertisement -

एकापेक्षा एक कॅरेक्टर

खिलाडी कुमारचं मराठी प्रेम काही नवीन नाही. खट्टा मिट्टा या सिनेमात अक्षयने साकारलेला सचिन टिचकुले या मराठमोठ्या तरुणाची भूमिका साकारली होती. तो अनेक कार्यक्रमात आवर्जून मराठीतून एक- दोन वाक्य म्हणतोच. त्यामुळे अक्षयचे मराठी प्रेम अनेकांना माहित आहे. आता त्याने निर्मिती केलेला सिनेमाचं येत आहे म्हटल्यावर त्याचे प्रमोशन मराठीतून अक्षय करणार याचा अंदाज होताच. या सिनेमाचे पोस्टर शेअर करत ‘एकापेक्षा एक कॅरेक्टर बाळू, डिस्को आणि प्रसन्ना’ असा उल्लेख केला आहे. या सगळ्या कॅरेक्टरचे विशेष देखील या पोस्टरमधून बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

वाचा- बघा ‘चुंबक’चं दुसरं पोस्टर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -