घरमुंबईमुंबईकरांनो आता पाणी कपातीचं नो टेन्शन! मोडक सागर तलाव भरून वाहू लागला

मुंबईकरांनो आता पाणी कपातीचं नो टेन्शन! मोडक सागर तलाव भरून वाहू लागला

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक मोडकसागर तलाव भरून वाहू लागला आहे. बुधवारी दुपारी १.०४ वाजताच्या सुमारास भरून वाहू लागला आहे. यापूर्वी मुंबईतील पिण्यायोग्य पाणी नसलेला पवई हा कृत्रिम तलाव ५ जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास भरून वाहू लागला होता. मोडक सागर पाठोपाठ तुळशी तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची व दिलासा देणारी गोड बातमी आहे.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत मिळून एकूण ८,१६,३७३ दशलक्ष लिटर (५६.४० टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा पुढील २१२ दिवस म्हणजे पुढील ९ फेब्रुवारी २०२३ पर्यन्त पुरेल इतका आहे. तसेच, अद्यापही पावसाळ्याचा अडीच महिना बाकी असून या कालावधीत आणखीन चांगला पाऊस पडल्यास सर्वच तलाव लवकरात लवकर भरून वाहू लागतील.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला ब्रेक, तर मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने

मोडक सागर हा तलाव गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये २२ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री ०३.२४ वाजता, सन २०२० मध्ये १८ ऑगस्ट रोजी रात्री ०९.२४ वाजता, २०१९ मध्ये २६ जुलै रोजी तर सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्ष हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये १ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.

- Advertisement -

सात तलावातील पाणीसाठा व टक्केवारी -:

तलाव पाणीसाठा टक्केवारी        दशलक्ष लि.

उच्च वैतरणा                        ९९,२६८ ४३.७२

मोडकसागर                        १,२८,९२५ १००.००

तानसा                              ९६,८९४ ६६.७९

मध्य वैतरणा                       १,०४,३२२ ५३.९०

भातसा                             ३,६६,११३ ५१.०६

विहार                             १४,७३० ५३.१८

तुळशी                            ६,१२१ ७६.०८
———————————————————-
एकूण                            ८,१६,३७३ ५६.४०


वसईत दरड कोसळली; दोन जणांचा मृत्यू, एनडीआरएफ दाखल, चार जण बचावले

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -