घरमुंबईलॉकडाऊनदरम्यान रेशन दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार

लॉकडाऊनदरम्यान रेशन दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार

Subscribe

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परंतु या लॉकडाऊनदरम्यान गरीब गरजूंचे खाण्याचे हाल होऊ नये यासाठी रेशन कार्ड धारकांसाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देण्यात आवे आहे. मात्र गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई, ठाणे शिधावाटपाची अधिकृत दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरुन शिधावाटप दुकानांबाहेर नागरिकांची गर्दी होणार नाही.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधाधारक शिधावस्तूपासून वंचित राहू नये यासाठी आवश्यक सुचना उपनियंत्रक शिधावाटप यांच्यातर्फे सर्व यंत्रणेला दिल्या आहेत. यात अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांस सरकारकडून देण्यात येणारे अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान मुंबई, ठाणे येथील शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र शिधाधारकांना सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी सरकारच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर संबंधित वेबसाईटवर आरसी डिटेल्समध्ये जाऊन आपला शिधापत्रिकेवरील १२ अंकी एसआरसी नंबर टाका. यानंतर तुम्ही तुमच्या रेशनकार्डवर किती किलो धान्य मिळते याचा तपशील मिळवू शकतो. तसेच याबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी खालील क्रमांकाचा वापर करु शकता. वन नेशन वन कार्डसंबंधीत हेल्पलाईन क्रमांक आहे, १४४४५ तर अन्य सेवा सुविधांसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे. ०२२-२२८५२८१४.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -