घरमुंबईपरीक्षा पध्दत बदलण्यासाठी ऑनलाइन याचिका

परीक्षा पध्दत बदलण्यासाठी ऑनलाइन याचिका

Subscribe

मुंबई विद्यापीठाने लॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षा पध्दतीत बदल करीत ६०/४० हा नवा पॅर्टन सुरू केला आहे. या पॅर्टनला विद्यार्थ्यांनी विरोध करीत यात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही विद्यापीठ या परीक्षा पध्दतीवर ठाम असल्याने आता विद्यार्थ्यांनी याविरोधात एल्गार पुकारला आहे. तर याप्रश्नी ऑनलाइन याचिका दाखल करीत विद्यार्थ्यांनी याविरोधात नव्या लढाईचा एल्गार पुकारला आहे. आतापर्यंत ३८० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाविरोधातील ही ऑनलाइन याचिकेत स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेयांक श्रेणी पध्दतीत बदल करीत ६०/४० पॅर्टन राबविले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे लॉ शाखेच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या नियमांत देखील बदल झाला आहे. या नव्या नियमानुसार आता ६० गुणांच्या परीक्षेत १८ तर ४० गुणांच्या परीक्षेसाठी १२ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक असणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनांनी विरोधाचा नारा सुरू केला आहे. तर यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळेल, अशी भीती यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगानुसार मुंबई विद्यापीठाने श्रेयांक श्रेणी पध्दत सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या पध्दतीत अनेकवेळा बदल करण्यात आला आहे. त्यात पुन्हा एकदा बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला असून त्याचे परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता ६०/४० ही पध्दत वापरण्यात येणार आहे. त्यानुसार लॉ शाखेमध्ये देखील ही पध्दत सुरू करण्यात आली आहे. लॉ शाखेत ६०/४० ही पध्दत लागू करण्यात आली असून या निर्णयानुसार आता ६० गुणांच्या परीक्षेत १८ गुण मिळविणे उत्तीर्णतेसाठी बंधनकारक ठरणार आहे. तर ४० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे एकत्रित पासिंगसाठी ४० गुणांचे पासिंग गुणोत्तर ठेवण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पास होणे अधिक सोपे झाल्याने विधी शाखेचे विद्यार्थी अधिक सक्षम होणार नाही, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयाविरोधात स्टुंडट लॉ कौन्सिलचे सचिन पवार यांनी प्रकुलगुरु डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन यास विरोध केला होता. त्यानंतरही विद्यापीठाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने आता ऑनलाइन याचिका सुरू केली आहे.
मुंबई विद्यापीठाविरोधात सुरू केलेल्या या ऑनलाइन याचिकेविरोधात आतापर्यंत ३८० जणांनी सही केली आहे. तर हा नियम रद्द करावा, अशी मागणीही या याचिकेत केली आहे. कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना या याचिकेत लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या याचिकेनंतर मुंबई विद्यापीठ काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -