घरताज्या घडामोडीMumbai Water Issue : मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही, धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्‍ध

Mumbai Water Issue : मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही, धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्‍ध

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा 32.32 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हा गेल्या तीन वर्षांतील नीचांक असून केवळ दीड ते दोन महिनेच हे पाणी पुरणार आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट मुंबईकरांना सहन करण्याची शक्यता होती.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा 32.32 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हा गेल्या तीन वर्षांतील नीचांक असून केवळ दीड ते दोन महिनेच हे पाणी पुरणार आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट मुंबईकरांना सहन करण्याची शक्यता होती. परंतू, महापालिकेने यावर तोडगा काढला असून, मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती दिली आहे. (mumbai water issue there is no cut in water supply to mumbaikars sufficient water storage is available in dams bmc)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या झालेल्‍या उच्‍चस्‍तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्‍यात आला. या बैठकीनंतर जून ते सप्‍टेंबर 2023 दरम्‍यान झालेल्‍या कमी पर्जन्यमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गत वर्षीपेक्षा तुलनेने कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच, राज्‍य शासनाने मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्‍ध करून दिले आहे, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, सद्यस्थितीत मुंबईकरांच्‍या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. येत्‍या पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल अशारितीने नियोजन केलेले आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. धरणातील उपलब्‍ध पाणीसाठ्यावर महापालिका बारकाईने लक्ष ठेऊन आहे. राज्‍य शासनानेदेखील निभावणी साठ्यातून महानगरपालिकेस पाणीपुरवठा करण्‍याचे यापूर्वीच मान्‍य केले आहे.

सद्यस्थितीत पाणीकपात करण्‍याचा महानगरपालिकेचा कोणताही प्रस्‍ताव नाही. मात्र, पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि मुंबई महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LOKSABHA 2024: सुनील तटकरेंना रायगडातून उमेदवारी; अजित पवारांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -