घरमहाराष्ट्रLoksabha 2024: सुनील तटकरेंना रायगडातून उमेदवारी; अजित पवारांची घोषणा

Loksabha 2024: सुनील तटकरेंना रायगडातून उमेदवारी; अजित पवारांची घोषणा

Subscribe

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) रायगड मतदारसंघात सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली. तसंच, येत्या 28 तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाणार असल्याचीही माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ( Loksabha 2024 Sunil Tatkare to contest from Raigad Ajit Pawar s announcement)

जागावाटपाचं 99 टक्के काम पूर्ण

अजित पवार म्हणाले की, आम्ही एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीच्या 48 जागांबद्दल महाराष्ट्रात कोणी कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल ठरवलं आहे. जवळपास 99 टक्के काम पूर्ण झालं आहे. फक्त आता 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र बसून पत्रकार परिषदत घेत इतर उमेदवारांची नावं जाहीर करणार आहोत.

- Advertisement -

शिरुरची घोषणा पक्षप्रवेशानंतर करणार

आम्ही थोड्या वेळात आंबेगावात जाणार आहोत. आंबेगावात शिवाजी आढळराव पाटील जे 20 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. त्यांना आता आम्ही पुन्हा पक्षप्रवेश देणार आहोत. तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी पक्षप्रवेशानंतर जाहीर करणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

2019 बाबत दिली माहिती

अजित पवार म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी आम्ही आघाडीच्या बाजूने लढलो. तर देवेंद्र फडणवीस, शिवसेना महायुती म्हणून लढले. त्यावेळी भाजपा 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 4, काँग्रेस, नवनीत राणा, 1, तर एमआयएमची 1 जागा.., असं म्हणत अजित पवार यांनी यानुसार जागा दिल्या गेल्या असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Arunachal Pradesh : अरुणालच आमचेच… महिन्याभरात चौथ्यांदा दावा; चीनचे दावे बिनबुडाचे, भारताचे प्रत्युत्तर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -