घरमुंबईमुंबईचे नवे आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी स्वीकारला पदभार

मुंबईचे नवे आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी स्वीकारला पदभार

Subscribe

राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर यांच्या हस्ते त्यांनी हा पदभार स्विकारला.  ३० जूनला राज्याचे माजी पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार मुंबई माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसागलीकर यांना २ महिन्यांसाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी नियुक्त करण्यात आले. 

मुंबईचे नवे आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी शनिवारी आयुक्त पदाचा पदभार स्विकारला.  तर राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणजून दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून  राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर यांच्या हस्ते त्यांनी हा पदभार स्विकारला.  ३० जूनला राज्याचे माजी पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार मुंबई माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसागलीकर यांना २ महिन्यांसाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी नियुक्त करण्यात आले.

कायदा सुव्यवस्था राखणार- जयस्वाल

मुंबई पोलीस आयुक्त पदाचा दरारा फक्त मुंबई आणि देशातच नाही तर परदेशातही दरारा आहे.मुंबई पोलीस दलात आजवर काम केलेल्या आणि काम करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या कतृत्वाने मुंबई पोलीस आयुक्त पदाला आज जगभर मान दिला जातो.त्यामुळे एकदा तरी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा मुकुट घालावा अशी प्रत्येक पोलीस अधिका-याची इच्छा असते त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदावर कोण विराजमान होणार?, याकडे मुंबईपासून ते परदेशापर्यंत अनेकांचे लक्ष होते. पण अखेर गृहखात्याने सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाचा ताज दिला आहे. आज मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सुबोध कुमार जयस्वाल यांनी कायदा सुव्यवस्था, दहशतवाद आणि सायबर क्राईमवर अधिक काम करणार असे सांगितले आहे.

- Advertisement -

सुबोधकुमार जयस्वालबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

  • सुबोधकुमार हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. रॉ गुप्तचर खात्यात त्यांनी काम पाहिले आहे
  • २००६ साली झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा तपास जयस्वाल यांच्याकडे होता
  • तेलगी प्रकरणात त्यांनी केलेला तपास केला होता
  • नक्षलग्रस्त भागातली त्यांचे काम वाखाण्ण्याजोगे होते 
  • मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे

पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त

दुसरीकडे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त झाले. नायगावच्या पोलीस मैदानावर शनिवारी सकाळी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस दलाकडून मोठ्या आदराने आणि दिमाखदार सोहळ्याने त्यांना निरोप देण्यात आला. फुलांनी सजवलेल्या गाडीतून माथूर यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांच्या बँड पथकाने वादनही केले.

दत्ता पडसलगीकर नवे पोलीस महासंचालक

राज्य पोलीस दलाचे महासंचालक सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले आहेत. माथूर यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना बढती मिळाली आहे. मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला असला तरी त्यांची सेवानिवृत्ती देखील जवळ आली आहे. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होतील. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी देखील नवा चेहरा पाहायाला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -