घरताज्या घडामोडीमुंबईकर झाले घामाघूम; आर्द्रतेचे प्रमाण वाढले!

मुंबईकर झाले घामाघूम; आर्द्रतेचे प्रमाण वाढले!

Subscribe

वातावरणातील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांना आज अतिशय अस्वस्थता जाणवली. आर्द्रतेचे प्रमाण वाढताना सरासरी ९० टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण होते, त्यामुळे उकाड्यात आणखी भर पडली.

मुंबईत लॉकडाऊनची स्थिती कायम असतानाच मुंबईकर आता वातावरणात वाढलेल्या उकाड्याने घामाघुम होत आहेत. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांना आज अतिशय अस्वस्थता जाणवली. आर्द्रतेचे प्रमाण वाढताना सरासरी ९० टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण होते, त्यामुळे उकाड्यात आणखी भर पडली. मुंबईकरांना एरव्हीपेक्षा आज अधिकच घामाच्या धारा लागल्या. मुंबईत कमाल तापमानाची नोंद ही बोरिवलीत ३६ डिग्री सेल्सिअस इतकी झाली. तर कमाल तापमानाची नोंद पवई येथे २९ डिग्री सेल्सिअस इतकी होती. बोरिवली पाठोपाठ जोगेश्वरी लिंक रोड आणि मुलुंड याठिकाणी कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई शहरात सरासरी ३० डिग्री सेल्सिअस ते ३५ डिग्री सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली. विशेषतः मुंबई उपनगरामध्ये कमाल तापमानाची नोंद झाली.

पण दिवसभर वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण मात्र सर्वाधिक राहिले. किमान तापमानात कुलाबा, वरळी, माझगाव, दादर, सांताक्रुझ, कांदिवली अशा ठिकाणी सरासरी २५ डिग्री सेल्सिअस ते २७ डिग्री सेल्सिअस असे राहिले. मुंबईतला वातावरणातील कमाल आणि किमान तापमानाचा हा वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. कमाल तापमानातही बदल पाहायला मिळत आहेत. तसेच शहराच्या तुलनेत उपनगरात जास्त तापमानाची नोंद आहे. शहरी भागात कुलाबा येथे ३१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे तर उपनगरात बोरिवलीसारख्या ठिकाणी सरासरी ३६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद पाहायला मिळाली. तर आर्द्रतेचे प्रमाणही दिवसभरात वाढतच गेल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -