घरटेक-वेकल्युडोत हरला अन् सहकाऱ्यालाच भोसकले

ल्युडोत हरला अन् सहकाऱ्यालाच भोसकले

Subscribe

मुंबई पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून पकडले, बक्षीसही मिळवले

विरंगुळा म्हणून ल्युडो खेळताना झालेला पराभव सहन झाल्याने आपल्याच सहकाऱ्याची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला गजाआड टाकण्यात अखेर पवई पोलिसांना यश आले आहे. केवळ ल्युडोमधील पराभव जिव्हारी लागल्याने अविनाशने अंकितची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. त्याच्याविरोधात हत्या, शस्त्र बाळगण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेश सरकारने पांडेवर १० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते, असे उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले.

अविनाश पांडे (३८) असे त्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सुरक्षा रक्षक म्हणून एकेठिकाणी नोकरी करत होता. अविनाश पांडे आणि अंकित सिंह हे एक दिवस मोबाइलवर ल्युडो खेळताना अविनाशचा अंकितकडून पराभव झाला. या रागातून त्याने अंकितची चाकूने हत्या केली व तो फरार झाला होता. पण अविनाश दिल्लीत असल्याची माहिती मिळताच पवई पोलिसांनी त्याला दिल्लीत जाऊन अटक केली. गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर २०१९ रोजी साकीविहार येथील सुप्रीम्स इमारतीत अंकिकचा गळा चिरला. त्यामुळे अंकितला अनेक जखमा झाल्या होत्या.

- Advertisement -

चाकूने निर्घृण वार करून अंकितची हत्या करण्यात आली होती. पण या घटनेनंतर अविनाश फरार असल्याचे उघडकीस आले. त्याचा तपास करताना सुरुवातीला कोणताच धागादोरा हाती लागत नव्हता. पण गेल्या आठवड्यात पांडे दिल्लीतील कमला मार्केट येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. मुंबईतील पवई पोलिसांच्या पथकाने दिल्लीत जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने अविनाशला अटक करून मुंबईत आणले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -