घरताज्या घडामोडीताम्हिणी घाटात अपघात, ३ मृत्यूमुखी, २ जखमी

ताम्हिणी घाटात अपघात, ३ मृत्यूमुखी, २ जखमी

Subscribe

आजचा दिवस हा अपघातांच्या बातम्यांनी उजाडला. आज सकाळी चंद्रपूर येथे अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तामिळनाडू येथे बस आणि कटेंनरची धडक होऊन झालेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अलिबाग-पुणे येथील माणगाव रस्त्यावरील ताम्हीणी घाटात आज पहाटे एका कारचा अपघात झाला. या अपघातात तिघे जण जागीच मृत्यूमुखी पडले तर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात येणार आहे.

हे वाचा – चंद्रपूर येथे भीषण अपघात; ६ भाविक ठार, ६ जखमी

- Advertisement -

हे देखील वाचा – बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जणांचा मृत्यू; बसची अवस्था पाहून धडकी भरेल

या अपघातामध्ये निखील घुले, चंद्रकांत निकम आणि विक्रम सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तर विजय पाटील आणि सुनील तेलंग हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त हे पुण्याहून दिवेआगरच्या दिशेने जात असताना सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोंडेथर गावाजवळ चालकाचा कारवरुन ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -