घरमुंबईआपलं महानगर इम्पॅक्ट! अवैधपणे मासळी विकणाऱ्या परप्रांतीयांनी ठोकली धूम

आपलं महानगर इम्पॅक्ट! अवैधपणे मासळी विकणाऱ्या परप्रांतीयांनी ठोकली धूम

Subscribe

महानगरपालिकेची कारवाई

परप्रांतीय नागरिकांकडून वाडीबंदर रोडवर सर्रासपणे अवैध पद्धतीने मासळी बाजार सुरू केला होता. परिणामी याचा फटका अधिकृत मासळी बाजाराला बसला होता. यामुळे मराठी कोळी महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. या संबंधित सर्वप्रथम वृत्त ‘दैनिक आपलं महानगर’ आणि ‘मायमहानगर’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली असून वृत्ताची दखल घेत अवैध पद्धतीने सुरू केलेल्या मासळी बाजारवर कारवाई करणे सुरू केले आहे.

अनलॉकची सुरुवात होताच संकट काळात मुंबई सोडून गेलेले परप्रांतीय श्रमिक लाखोंच्या संख्येने मुंबईत पुन्हा परतू लागले आहेत. मात्र, हाताला काम नसल्याने त्यांनी वाडीबंदर रोडवर अवैध पद्धतीने मुंबईच्या रस्त्यावर मासळी बाजार सुरू केला होता. त्याचा फटका अधिकृत असलेल्या बाबू गेनू मासळी बाजार, डोंगरी मासळी बाजार आणि मांडवी मासळी बाजाराला बसला होता. वाडीबंदर येथे भर रस्त्यावर सकाळपासून अवैधरित्या मासळी बाजार भरतो. या मासळी बाजारात मासे विक्रेत्यांमध्ये बंगाली, हैद्राबादी तसेच भैय्यांची मोठी संख्या आहे. हे परप्रांतीय नागरिक बर्फात साठवून ठेवलेले शिळे मासे स्वस्त दरात विक्री करत होते. त्यामुळे ताजे मासे विक्री करणार्‍या कोळी महिलांकडे ग्राहक येत नव्हते. गेल्या दोन महिन्यांपासून परप्रांतीय लोकांचा सर्रासपणे हा अवैध व्यवसाय सुरू होता. यासंबंधी मराठी कोळी महिलांनी स्थानिक प्रशासनाला तक्रार केली होती. मात्र, यावर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नव्हती. यासंबंधीचे सर्वप्रथम वृत्त ‘दैनिक आपलं महानगर’ आणि ‘मायमहानगर’ने दिले होते. तसेच त्या महिलांच्या समस्या मांडल्या होत्या. याची दखल घेत महानगरपालिकेने वाडीबंदर रोडवर भरत असलेल्या अवैध मासळी बाजारावर शुक्रवारी आणि शनिवारी कारवाई केली आहे. तसेच सकाळपासून महापालिकेचे पथक दररोज रत्यावर मासे विक्री करणार्‍यांवर कारवाई करत आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेची कारवाई

महानगरच्या वृत्तानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा या प्रकरणाची दखल घेण्यात आली. तसेच या वाडीबंदर रोडवर सुरू असलेल्या अवैध मासळी बाजाराला घेऊन मनसे कार्यकर्ते कपिल पाटील यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्या. तसेच मराठी कोळी महिलांच्या समस्या सुद्धा ऐकूण घेतल्या होत्या. त्यानंतर ही बाब कपिल पाटील यांनी स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तसेच येत्या काही दिवसांत हा अवैध व्यवसाय थांबवला नाही तर आम्ही येणार्‍या काळात मनसे स्टाईल यांना उत्तर देऊ, असा इशारा सुद्धा दिला होता. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने महानगरच्या वृत्ताची दखल घेत अवैध पद्धतीने सुरू केलेल्या मासळी बाजारवर कारवाई केली आहे.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -