घरमुंबईप्लास्टिक पिशव्यांसह बॉटल्स परिधान करत कॅट वॉक

प्लास्टिक पिशव्यांसह बॉटल्स परिधान करत कॅट वॉक

Subscribe

प्लास्टिकच्या जनजागृतीसाठी महापालिकेचे अनोखा फॅशन शो,वरळीतील एनएससीआयवर कचरा विल्हेवाटीसंदर्भात प्रदर्शन

मुंबईतील प्लास्टिक कचर्‍याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने आता अनोख्या पध्दतीच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले. या फॅशन शो मध्ये प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक वस्तू, तसेच प्लास्टिक बॉटल्ससह कापडी पिशव्या परिधान करत कॅटवॉक करणार आहेत. या फॅशन शोच्या माध्यमातून कचरा पुनर्चक्रीकरणाच्या विविध पध्दती, उपलब्ध सामग्री व त्यांचा वापर या विषयावर या फॅशन शोचे होणार आहे.

निर्माण होणारा कचरा वेगळा करणे तसेच कचर्‍यापासून खत निर्मिती याबाबतचे प्रदर्शन व प्रशिक्षण मुंबईच्या जनतेसाठी महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांकडून निर्माण होणार्‍या कचर्‍यापासून खत निर्मिती करण्याचे तंत्र, तसेच पध्दती प्रदर्शित करण्यात येतील. याशिवाय कचरा वर्गीकरण व कचर्‍यापासून खत निर्माण करणार्‍या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने शुक्रवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियाच्या एम्पेरर सभागृहामध्ये प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये फॅशन शोचे अनोखे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये टाकावू प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल्स यापासून बनवलेले कपडे परिधान करत शोमध्ये सहभागी होणार आहेत. तर सर्वांत शेवटी कापडी पिशव्यांपासून बनवलेला पेहराव करून फॅशन शोमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे वेगळ्याप्रकारचे हे फॅशन असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

स्पर्धकांना थेट बक्षीसाची रक्कम
स्वच्छतेच्या कामांमध्ये सहभागी होणार्‍या लोकांना तसेच घटकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने डिसेंबर २०१९मध्ये उपहारगृह, शाळा, रुग्णालये, रहिवाशी संस्था आणि मार्केट असोशिएशन इत्यादी ठिकाणी स्वच्छतेचे मूल्यांकन केले आहे. यामध्ये प्रथम विजेते ठरलेल्या संस्थांची गौरव यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम विजेत्या ठरलेल्या संस्थांना एक ते दीड लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तर द्वितीय व तृतीय विजेत्यांना स्मृतीचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देवून महापालिकेच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. अशाप्रकारे विजेत्या संस्थांना महापालिकेच्यावतीने बक्षीसाची रक्कम देण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे भविष्यात त्यांच्यामध्ये सकारात्मक स्पर्धा होईल,असा विश्वास घनकचरा विभागाच्या सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

मालमत्ता कर सवलतीची माहिती
कचरा वर्गीकरण करून खत निर्मिती करत कचर्‍याची विल्हेवाट लावणार्‍या संस्थांना महापालिकेच्यावतीने मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाच ते पंधरा टक्के एवढी सवलत कुठल्या कामांमध्ये मिळू शकते, याची माहिती संस्थांना आणि लोकांना दिली जाईल. जेणेकरून गृहनिर्माण संस्था मालमत्ता सवलत किती टक्के मिळावी, त्याद़ृष्टीकोनातून कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी संस्था पुढे येतील,असा विश्वास अधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -