घरमुंबईधक्कादायक! मुलीला दूध पाजण्यास नकार देणाऱ्या पत्नीची हत्या

धक्कादायक! मुलीला दूध पाजण्यास नकार देणाऱ्या पत्नीची हत्या

Subscribe

एका वर्षाच्या मुलीला दूध पाजण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना भिवंडी येथे रविवारी उघडककिस आली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

पूजा भजनसिंग जाधव (वय २३) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. पूजा ही पती भजनसिंग (वय २५) आणि एका वर्षाच्या मुलीसोबत भिवंडीतील काल्हेर प्रणाम कॉम्प्लेक्स येथे राहण्यास होती. रविवारी पहाटे मुलगी सारखी रडत असल्यामुळे भजनसिंग याने पत्नी पूजाला झोपेतून उठवून मुलीला दूध पाजण्यास सांगितले. मात्र मी दूध पाजणार नाही, तुम्ही तिला गप्प करा, असे पत्नीने सांगताच संतापलेल्या भजनसिंग याने पत्नी पूजाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. वर्मी घाव बसताच पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली, पती भजनसिंगचे तिला उचलून नजीकच्या रुग्णालयांत उपचारासाठी घेऊन आला असता डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पत्नी पूजा बाथरूममध्ये घसरून पडली असल्याचे पती भजनसिंग याने पोलिसांना सांगितले. मात्र पूजाच्या चेहऱ्यावरील जखमेवरून पोलिसांना संशय येताच पोलिसांनी भजनसिंगची उलट तपासणी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून भजनसिंगला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

हेही वाचा –

Corona Effect: Cafe Coffee Day ने बंद केले आपले २८० आऊटलेट्स!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -