घरमुंबईमाझेही मत ...

माझेही मत …

Subscribe

लोकहिताची कामे करावी
मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे. निवडणूक म्हणजे करमणुकीचा खेळ नसून निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करत योग्य उमेदवार निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच निवडून आलेल्या उमेदवारानेही लोकहिताची कामे करणे गरजेचे आहे. सद्य परिस्थिती पाहिल्यास मागील काही वर्षातील विविध क्षेत्रातील रखडलेला विकास यामुळे मतदाराचा या निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडाला आहे. परिणामी निवडणुकीतील मतदानाचा टक्का कमी झाल्याचे आपण निवडणुकांतून पाहतो. निवडणुकीकडे पाठ न फिरवता आपल्या मतदारसंघातील योग्य उमेदवाराची निवड करणे हे देशाचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. -रुचिता लांजे, विद्यार्थिनी

उमेदवाराचे शिक्षण, विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा
मतदार संघातील उमेदवाराचे शिक्षण, त्याचा विकासात्मक दृष्टिकोन याबाबत मतदारांनी सजग असणे गरजेचे आहे. उमेदवाराची कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाही ना याबाबत मतदारांनी माहिती घेणे गरजेचे आहे. मतदान करून ५ वर्षाचा कालावधी आपण उमेदवाराला विकासासाठी देतो. तेव्हा त्याच्या कालावधीत त्याने कोणती कार्ये केली, मतदारसंघात विकासात्मक कामे झाली का? आपल्या मतदार संघातील दोन तीन उमेदवार सोडल्यास अनेकांना इतर उमेदवारांबाबत माहितीच नसते. त्यामुळे सर्व उमेदवारांबाबत माहिती करून घेत योग्य उमेदवाराला मतदान करावे. -पूजा क्षीरसागर, नोकरदार

- Advertisement -

मतदानाविषयी जनजागृती महत्वाची
देशातील लोकतंत्र मजबूत करण्यासाठी या राष्ट्रीय उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वानी सहभागी व्हावे. आज सुद्धा देशभरात मतदान विषयी पाहिजे ती जनजागृती होत नाही. नुकतेच विदर्भातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र या मतदानात फक्त ६२ टक्केच नागरिकांनी मतदान केले आहे. बाकी उर्वरित नागरिकांनी मतदान केले नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगांनी यावर लक्ष दिले पाहिजे. कारण आपलं एक मतदान देशाचे भवितव्य ठरवते. -लक्ष्मी पाटील, गृहिणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -