घरक्राइमभटक्या कुत्र्यांनी घेतला कोंबड्यांचा जीव; मालकाची आत्महत्या

भटक्या कुत्र्यांनी घेतला कोंबड्यांचा जीव; मालकाची आत्महत्या

Subscribe

कोरोना काळात मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या कामगारांचे दोन वेळच्या जेवनाचे हाल झाले होते. तर नोकरदार वर्गाच्या नोकऱ्या संकटात आल्या. या परिस्थितीतून सावरत कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला आर्थिक फटका सहन करावा लागल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. नालासोपाऱ्यातील एका व्यक्तीने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र हा व्यवसाय भटक्या कुत्र्यांमुळे अधिक काळ टिकला नाही. कारण या व्यावसायिकाच्या तब्बल १५ कोंबड्या भटक्या कुत्र्यांनी खाल्ल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. यापरिस्थितीमुळे  नैराश्यात सापडलेल्या कुक्कुटपालक व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. शनिवारी दुपारी गावाजवळील तलावात उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

थॉमस अतोन समाव (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. थॉमस आपल्या कुटुंबासह नालासोपाऱ्यातील गासगाव येथे राहत होता. कोरोना काळात त्याने रोजगारासाठी 20 कोंबड्या पाळल्या होत्या. परंतु शुक्रवारी रात्री काही भटक्या कुत्र्यांनी कोंबड्या असलेल्या खोलीत शिरत 15 कोंबड्या खाऊन टाकल्या. या घटनेमुळे थॉमस यांना धक्का बसला आणि नैराश्येत येत त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी थॉमस यांनी डिप्रेशनमध्ये जात आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -