घरताज्या घडामोडीनारायण राणेंनी अमित शाहांना फोन केलाच नाही- पोलिसांची न्यायालयात माहिती

नारायण राणेंनी अमित शाहांना फोन केलाच नाही- पोलिसांची न्यायालयात माहिती

Subscribe

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हीच्या मृत्यूनंतरही तिची बदनामी करत असल्यप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांनी राणे पिता पुत्रांना चौकशीसाठी बोलावले होते. तबब्ल ९ तासाच्या चौकशीनंतर राणे पोलीस ठाण्यातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मीडियाला केंद्रीय मंत्री अमित शाह यांना फोन केल्ायनंतर आपल्याला सोडण्यात आल्याचा दावा केला होता. तो दावा खोटा असल्याचा पोलिासंनी न्यायालयाला सांगितले आहे.

दिशाची मृत्यूनंतरही राजकारण्यांकडून सतत बदनामी होत आहे. यावरून दिशाची आई वासंती सालियन यांनी राणे पिता पुत्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर राणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणे यांचे वकील अॅड सतीस मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राणेंविरोधात राजकीय वादातून गुन्हा दाखल करण्याचा दावा यात करण्यात आला आहे. तसेच हा गुन्हा रद्द करावा असेही राणे .यांनी याचिकेत म्हटले आहे. यादरम्यान न्यायालयाने राणेंच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार ५ मार्च रोजी राणेंना पोलीस स्थानकात हजर राहण्याचे सांगण्यात आले. पण ते तपासात सहकार्य करत नसल्ायचे पोलिसांनी सांगितले. तसेच चौकशी संपल्यानंतर मीडियाला शाह यांना फोन केल्यानंतर आपली सुटका झाल्याची खोटी विधान राणेंनी केली अशा दावा पोलिसांनी न्यायालयासमोर केला आहे. तसेच राणेंच्या बोलण्यातून ते साक्षीदारांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे त्यांना जामिन दिल्यास ते तपासात सहकार्य करणार नाही असेही पोलिासंनी न्यायालयासा सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -